मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट अन्...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट अन्...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

बसनं पेट घेताच चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे. या भयंकर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

हैदराबाद 24 जुलै : चालकानं रस्त्यानं गाडी चालवताना अतिशय सावध असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कोणतं संकट कधी येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशात विशेषतः बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या चालकांना तर विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण, अनेक लोकांना सोबत घेऊन ते दररोज प्रवास करत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली असून यात बसनं पेट घेताच चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे. या भयंकर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.

VIDEO: अजब! गावच्या सरपंचाला करावी लागते गाढवाची सवारी, कारण ऐकून व्हाल थक्क

ही घटना तेलंगणातील (Telangana) हैदराबाद (Hyderabad) इथली आहे. घटनेत तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस हनमकोंडा इथून हैदराबादकडे निघाली होती. मात्र, ही बस घानपूरजवळ पोहोचताच तिच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. बघता बघता संपूर्ण बसनंच पेट घेतला (TSRTC Bus Caught Fire). या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आलं.

VIDEO : कोल्हापुरातील शेकडो गावांना महापुराचा फटका; महामार्गावर 6 फूट पाणी

काहीच वेळात संपूर्ण बस जळून खाक झाली. स्थानिक लोकांनी सुरुवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीनं रौद्ररुप धारण केल्यानं हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि काहीच वेळाच पूर्ण बस जळून खाक झाली. ही आग इतकी भयानक होते की दूरदूरपर्यंत धुराचे लोट पसरले. ही संपूर्ण घटना आसपास उभा असलेल्या लोकांनी कॅमेऱ्याच कैद केली.

First published:

Tags: Fire, Hyderabad, Shocking video viral