मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: अजबच! गावच्या सरपंचाची थेट गाढवावरून मिरवणूक, कारण ऐकून व्हाल थक्क

VIDEO: अजबच! गावच्या सरपंचाची थेट गाढवावरून मिरवणूक, कारण ऐकून व्हाल थक्क

सरपंचांनी पावसाच्या देवाला आनंदी करण्यासाठी गाढवाची सवारी केली. जेणेकरून इंद्र देवतांनी आनंदी व्हावं आणि चांगला पाऊस व्हावा.

सरपंचांनी पावसाच्या देवाला आनंदी करण्यासाठी गाढवाची सवारी केली. जेणेकरून इंद्र देवतांनी आनंदी व्हावं आणि चांगला पाऊस व्हावा.

सरपंचांनी पावसाच्या देवाला आनंदी करण्यासाठी गाढवाची सवारी केली. जेणेकरून इंद्र देवतांनी आनंदी व्हावं आणि चांगला पाऊस व्हावा.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 जुलै : देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि समजूती आहेत. अशाच अनेक परंपरा पावसासाठीही (Rain) आपल्या देशात मानल्या जातात. मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातूनही आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे सरपंचांनी पावसाच्या देवाला आनंदी करण्यासाठी गाढवाची सवारी केली. जेणेकरून इंद्र देवतांनी आनंदी व्हावं आणि चांगला पाऊस व्हावा. सध्या सोशल मीडियावर (Social Media) गाढवाची सवारी (Donkey Riding) करणाऱ्या या सरपंचाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. अशात विदिशा जिल्ह्यातील रंगई गावाता पावसासाठी एक अनोखी सवारी काढण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा गाढवावर बसून संपूर्ण गावभर फिरले. यात गावातील लोकं, महिला आणि लहान मुलंही सहभागी झाली. लोकांनी सरपंचांचं स्वागतही केलं. सरपंच गाढवावर तर त्यांच्यासोबतचे लोकं बँड-बाजा वाजवत नाचत-गात जात होते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Viral Video : भारतीय क्रिकेटपटूंनी स्वीकारलं 'Wrong Answers Challenge'

ही सवारी पटेल बाबा देवस्थान इथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. सरपंच सुशील वर्मा यांचं असं म्हणणं आहे, की ग्रामीण भागात असं मानलं जातं, की गावाच्या सरपंचानं गाढवाची सवारी केल्यास इंद्र देवता प्रसन्न होतात आणि पाऊस होतो. याच कारणामुळे त्यांनी गाढवाची सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं काम आहे. याच कारणामुळे आपण गाढवाची सवारी करून देवाकडे प्रार्थना केल्याचं त्यांनी म्हटलं.

" isDesktop="true" id="583634" >

अनेकांचा जीव घेणारी दरड कोसळते तेव्हा नेमकं काय होतं?  Live Video पाहून हादराल!

सरपंचांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकं हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. काही लोकांनी यावर विनोद केले आहेत तर काहींनी हे देशभरात सगळीकडे केलं गेलं पाहिजे, असं म्हटलं आहे. जेणेकरून पूर्ण देशातच चांगला पाऊस व्हावा.

First published:

Tags: Live video viral, Madhya pradesh