Home /News /kolhapur /

कोल्हापुरात महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला; राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 6 फूट पाणी, धक्कादायक VIDEO

कोल्हापुरात महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला; राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 6 फूट पाणी, धक्कादायक VIDEO

Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेकडो गावांना फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.

कोल्हापूर, 24 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महापुराची (Flood situation in Kolhapur) स्थिती निर्माण झाली आहे. या महापुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर (National Highway closed due to flood) आले आहे. यामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले आहे. महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात तब्बल 6 फूट पाणी आल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण (Radhanagari Dam) 95 टक्के भरलं आहे. धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून स्वयंचलित दरवाजे कधीही उघडले जाणार आहेत. धरणाचे दरवाजे उघडल्यास पंचगंगा नदी (Panchganga River) पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र, मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 116 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी गावाजवळ असलेल्या घटप्रभा नदीला महापूर आलाय, इतिहासात पहिल्यांदा इथल्या हडलगे धरणावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे, या भागातील हा सर्वात उंच पूल आहे, पण चंदगड भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळं घटप्रभा नदी सध्या धोक्याच्या पातळीवर आहे, तर नेसरी सह नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Kolhapur, Rain, Rain flood, Weather update

पुढील बातम्या