जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / रात्रीच्या वेळी भूत बनून लोकांना घाबरवायला गेलेली तरुणी; गमवावा लागला स्वतःचाच जीव

रात्रीच्या वेळी भूत बनून लोकांना घाबरवायला गेलेली तरुणी; गमवावा लागला स्वतःचाच जीव

रात्रीच्या वेळी भूत बनून लोकांना घाबरवायला गेलेली तरुणी; गमवावा लागला स्वतःचाच जीव

मरण पावलेल्या या तरुणीचं वय 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. तिनं लॅटिन अमेरिकेच्या ‘La Llorona’ प्रमाणे स्वतःला तयार केलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेक्सिको 23 ऑक्टोबर : शेजाऱ्यांना घाबरवण्याच्या नादात एका तरुणीला आपलाच जीव गमवावा लागला आहे. ही तरुणी रात्रीच्या वेळी भितीदायक मेकअप करून पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रस्त्यावर फिरत होती (Woman Dressing as a Ghost to Scare Neighbors). तिला या रुपात पाहून एका व्यक्तीनं घाबरुन तिच्यावर गोळीबार केला (Woman Shot Dead). ही घटना मेक्सिकोच्या (Mexico) नोकलपन डी जुआरेज येथील आहे. पोलिसांनी मृत तरुणीची ओळख उघड केलेली नाही. अनैतिक संबंधात पतीचा होता अडथळा, 1 लाखाची सुपारी देऊन पत्नीने केला गेम द सनच्या वृत्तानुसार, मरण पावलेल्या या तरुणीचं वय 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. तिनं लॅटिन अमेरिकेच्या ‘La Llorona’ प्रमाणे स्वतःला तयार केलं होतं. असं म्हटलं जातं, की La Llorona एक भूत होती, जी आपल्या मुलांच्या आठवणीत रस्त्यांवर रडत फिरत असे. मृत महिला याच अंदाजात रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरत गोती. आसपास राहणाऱ्या लोकांनी तिचा व्हिडिओदेखील बनवला. बॉयफ्रेंडच्या कबरीवर खाट टाकून झोपत होती गर्लफ्रेंड;महिन्यानंतर धक्कादायक खुलासा एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं, की तरुणी अतिशय भितादायक गेटअपमध्ये होती. ती रडत रडत ओ मेरे बच्चे असं ओरडत होती. तिला पाहून एक व्यक्ती प्रचंड घाबरला आणि गोळीबार करू लागला. यातच महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी तिथून फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलिसांचं म्हणणं आहे, की 15 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेची चौकशी सुरू आहे. सध्या या प्रकरणाबाबत अधिक काही बोलता येणार नाही. मेक्सिकोमध्ये 31 ऑक्टोबरला हॅलोविन डे साजरा करण्याची तयारी सुरू आहे. यादिवशी लोक भूतांप्रमाणे मेकअप करतात. ते स्वतःला अशा प्रकारे तयार करतात की लोकांनी त्यांना पाहून घाबरावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात