Aurangabad: अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

Aurangabad: अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

Wife killed husband: प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने त्याची हत्या (Wife killed husband) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकरासोबत मिळून पत्नीने (Husband killed with help of lover) हे कृत्य केलं आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृतक व्यक्तीच्या पत्नीसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामचंद्र जायभाये हे आपली पत्नी मनिषा आणि मुलासोबत औरंगाबादमध्ये राहत होते. रामचंद्र यांची पत्नी मनिषाचे मित्रासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती रामचंद्र यांनाही मिळाली होती आणि त्यामुळे ते दारूच्या आहारी गेले होते. तर मनिषा यांना आपल्या प्रेमात रामचंद्र यांचा अडथळा वाटत होता आणि त्यामुळे त्यांचा काटा काढण्याचा निर्णय तिने घेतला.

20 ऑक्टोबर रोजी रात्री रामचंद्र हे घरात झोपलेले होते. त्यावेळी मनिषाने आपला प्रियकर गणेश उर्फ समादान फरकाडे याला बोलवून घेतले. यानंतर त्यांनी चाकूच्या सहाय्याने रामचंद्र यांची हत्या केली. यानंतर दोघांनी मिळून रामचंद्र यांचा मृतदेह एका नाल्यात फेकला. या प्रकरणात मनिषा आणि तिचा प्रियकर गणेश यांना इतरही मित्रांनी मदत केली. या कामासाठी मनिषाने एक लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

रामचंद्र यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असता पत्नी मनिषा हिच्यावर पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी पत्नी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर मनिषाने चौकशीत सर्व सत्य सांगितले. मग पोलिसांनी मनिषाचा प्रियकर गणेश आणि त्याच्या इतर मित्रांनाही अटक केली.

या प्रकरणी मृतक रामचंद्र यांचा भाऊ कृष्णा याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना अटक केली आहे. रामचंद्र आणि मनिषा यांना एक लहान मुलगा आहे. वडील या जगात नाहीयेत आणि आईला पोलिसांनी अटक केली आहे यामुळे आता या लहानग्याचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोपाळमध्ये विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या

आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य झालेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली बिहारची राजधानी भोपाळमध्ये. इथं राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा मुलगादेखील आहे. एका इमारतीतील लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्या अक्षय यांना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांबाबत माहिती समजली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.

Published by: Sunil Desale
First published: October 23, 2021, 9:01 AM IST

ताज्या बातम्या