Home /News /videsh /

अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा पाठवणार सैन्य?, जो बायडन यांचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा पाठवणार सैन्य?, जो बायडन यांचा मोठा निर्णय

File Photo

File Photo

अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेताच अफगाणिस्तानाच युद्धाला तोंड फुटलं आहे. अमेरिकन सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना तालिबानने (taliban) हिंसक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

    काबूल, 13 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी (American Army went Back) घेतलं आहे. यावर्षी मे महिन्यांत अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेताच अफगाणिस्तानाच युद्धाला तोंड फुटलं आहे. अमेरिकन सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना तालिबानने (taliban) हिंसक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस तालिबान आपली ताकद वाढवत असून एक-एक शहर आपल्या ताब्यात घेत आहेत. तालिबाननं आतापर्यंत अफगाणिस्तानातील जवळपास 80 टक्के क्षेत्र काबीज केलं आहे. यामुळे 4 लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. अफगाणिस्तानात तालिबान संघटनेचा वाढता प्रभाव लक्षात घेता, आता अमेरिकन सैन्य परत अफगाणिस्तानात माघारी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे. हेही वाचा- अफगाणिस्तानच्या मोठ्या शहरावर तालिबानचा हल्ला, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर पेंटागनच्या जॉन किर्बी यांनी सांगितलं की, काबूल येथील दूतावासातील अमेरिकन कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात पाठवणार आहे. यामध्ये जवळपास 3 हजार सैनिकांचा समावेश असणार आहे. तसेच अमेरिकेच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशात परतण्यास तालिबाननं कोणतीही आडकाठी केली, तर अमेरिकन सैन्य तातडीनं कारवाईच्या पावित्र्यात उतरणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. हेही वाचा-अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण;कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन एवढंच नव्हे तर, ब्रिटनही आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी जवळपास 6000 सैन्य अमेरिकेला पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे तालिबाननं शुक्रवारी अफगाणिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर कंधारवरही ताबा मिळवला आहे. तालिबानी दहशतवादी आता काबूलपासून अवघ्या 130 किमी अंतरावर आहेत. कोणत्याही क्षणी हल्लेखोर काबूलवर हल्ला करू शकतात. यामुळे काबूल शहरात अडकून पडलेले आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. भारतानंही यापूर्वीच आपल्या नागरिकांना मायदेशी परत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी विशेष विमानदेखील पाठवण्यात आलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, America, Taliban

    पुढील बातम्या