मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण? कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन

अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण? कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन

सध्या तालिबानी घरोघरी जात अशा मुलींचा शोध घेत आहेत.

सध्या तालिबानी घरोघरी जात अशा मुलींचा शोध घेत आहेत.

सध्या तालिबानी घरोघरी जात अशा मुलींचा शोध घेत आहेत.

  काबुल, अफगाणिस्तान, 11 ऑगस्ट : अमेरिकी (America) आणि नाटोचे (NATO) सैन्य अफगाणिस्तानमधून (Afghanistan) परतताच तिथे परत तालिबानींचा (Taliban) दबदबा वाढताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानींमध्ये देशभरात संघर्ष होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांत आठ प्रांतांच्या राजधान्यांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानींनी केला आहे. येत्या काही दिवसांत अजून काही महत्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याची तयारी तालिबानींनी केल्याचे एका अहवालातून स्पष्ट होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण तरुण मुलींना सेक्स गुलाम (Sex Slave) बनवण्यासाठी सध्या तालिबानी घरोघरी जात अशा मुलींचा शोध घेत आहेत. काही भागांत तर जबरदस्तीने घरात घुसून मुली आणि विधवा महिलांचे अपहरण देखील केले जात आहे. अफगाणिस्तानमधील महिलांची सद्यःस्थिती आणि तालिबानींच्या कारवायांबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे. जाणून घेऊया या परिस्थितीविषयी सविस्तर.

  अमेरिकी आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडू लागताच, पुन्हा या देशात दहशतवाद (Terrorism) आणि अशांतता पसरु लागल्याचे दिसून येत आहे. काही महत्वाच्या प्रांतांवर तालिबानींनी ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानींमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. एकीकडे अशा प्रकारे संघर्ष सुरू असताना दुसरीकडे तालिबानींनी अफगाणिस्तानमधील महिलांना आपले लक्ष्य केले आहे. द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील तरुण मुलींना सेक्स गुलाम बनवण्यासाठी तालिबानी लोक घरोघरी जाऊन तरुण मुलींचा शोध घेत आहेत. तालिबानी नेते अफगाणिस्तानमधील तरुणींचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांच्याशी विवाह करत त्यांना सेक्स गुलाम बनवण्याचे काम करत आहेत. तालिबानींचा हा प्रकार इराक आणि सिरीयामधील महिलांना सेक्स गुलाम बनवण्यासाठी कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूर कृत्याशी मिळताजुळता आहे. आपल्या मुलांचा विवाह करता यावा यासाठी तालिबानी लोकांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या भागातील इमामांना 15 वर्षांवरील युवती आणि 45 वर्षांखालील विधवा महिलांची एक यादी तयार करुन आमच्याकडे सोपवावी असे सांगितले होते. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर गेली असून, तालिबानी जबरदस्तीने घरात घुसून अशा वयोगटातील महिलांचे अपहरण करत असल्याचे, एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.

  तसेच तालिबानव्याप्त भागात महिला आणि पुरुषांसाठी अनेक कठोर कायदे तयार करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा दिली जाईल असेही सांगण्यात येत आहे. या भागात शरिया कायदयानुसार निर्बंध लागू झाल्यास येथील महिलांचे स्वातंत्र्य (Freedom) धोक्यात येणार आहे. या पूर्वी उत्तर अफगाणिस्तानमधील एका जिल्ह्यावर ताबा मिळवल्यावर तालिबानींनी स्थानिक इमामांना एक पत्र लिहित फर्मान काढले होते. एएफपीच्या वृत्तानुसार, या पत्रात महिलांना पुरुषसोबत नसल्यास बाजारात जाता येणार नाही, पुरुषांना दाढी वाढवावी लागेल, तसेच सिगारेट किंवा विडी ओढण्यास बंदी असेल असे नमूद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, महिलांना हिजाब परिधान करणं अनिवार्य असेल, शाळेत महिला शिक्षिका नसतील तर मुलींना शाळेत जाता येणार नाही. हे नियम मोडल्यास संबंधितास कडक शिक्षा दिली जाईल, असे नमूद करण्यात आले होते.

  या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना अफगणिस्तानमधील राष्ट्रीय सलोखा उच्च परिषदेच्या सदस्या फारुखंदा जाहरा नादेरी म्हणाल्या की या माध्यमातून नेतृत्व करत असलेल्या महिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न तालिबानी करत आहेत. जर तालिबानींनी महिला नेतृत्वास अशा प्रकारे अडचणीत आणले तर महिलांच्या हक्क (Women Rights) आणि अधिकारांविषयी कोण बोलणार? गेल्या 20 वर्षात जो विकास झालाय तो कोण कायम ठेवणार हा प्रश्नच आहे.

  तालिबानींची वाढती दहशत पाहून अफगाणिस्तानमधील महिला देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानमधील ही बदलती परिस्थिती पाहता अफगाणिस्तानचा प्रसिध्द क्रिकेटपटू रशिद खान याने व्टिटरच्या माध्यमातून अशा संकटग्रस्त वातावरणात आमच्या देशाला आधार द्यावा, अशी विनंती लोकांना आणि जागतिक नेत्यांना केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Taliban, Terrorist