मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर तालिबानचा हल्ला, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर

अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर तालिबानचा हल्ला, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर

तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे.

तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे.

तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : अफगाणिस्तानातील दहशतवादामुळे असलेली अशांतता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालिबानने पुन्हा एकदा या देशावर कब्जा मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत आणि ते हळूहळू देशातील एकेक शहर आपल्या अंमलाखाली आणत आहेत. अमेरिका (US Army) आणि नाटोचं लष्कर (NATO) जोपर्यंत अफगाणिस्तानात होतं तोपर्यंत शांतता होती आणि तालिबानला खूप मोठा पल्ला गाठता आला नाही. पण हे सैन्य निघून गेल्यानंतर तालिबानने (Taliban Terror) प्रचंड दहशत माजवत शुक्रवारी देशातलं दुसरं मोठं शहर कंदाहारवर कब्जा मिळवला असं वृत्त वृत्तसंस्था एएफपीने दिलं आहे. आता तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे.

  भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिशची हत्या तालिबानी दहशतवाद्यांनी कंदाहारमध्येच (Kandahar) केली होती. गुरुवारी तालिबानने दोन प्रांतांच्या राजधान्या गझनी (Gazani) आणि हेरात या शहरांवर कब्जा मिळवला. तालिबानचे दहशतवादी काबुलपासून फक्त 130 किलोमीटर अंतरावर असून ते कधीही राजधानीच्या दिशेने कूच करू शकतात. तालिबानने आतापर्यंत जरांज, शेबरगान, सर-ए-पुल, कुंदुज, तालोकान, ऐबक, फराह, पुल ए खुमारी, बदख्शां, गजनी, हेरात, कंदाहार या 12 राज्यांच्या राजधानीच्या शहरांवर (State Capitals) कब्जा केला आहे. गुरुवारी गझनीमध्ये दहशतवाद्यांनी पांढरे झेंडे फडकवले. शहरातील दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं, की शहराबाहरेच्या एका लष्करी संस्थेत आणि गुप्त ठिकाणावर चकमकी अजूनही सुरू आहेत. तालिबानने त्यांचे दहशतवादी गझनी शहरात पोहोचल्याचे काही व्हिडीओ आणि फोटो (Video and Photo) ऑनलाइन शेअर केले आहेत.

  दोन-तृतीयांश अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; सरकार सत्तेत वाटा देणार?

  अनेक दिवसांपासून लढाई सुरू आहे, पण अफगाणी लष्कर आणि सरकार याबाबत कोणतंही वक्तव्य करायला तयार नाही. तालिबानपासून काबुलला थेट धोका नसला तरीही हे दहशतवादी ज्या वेगाने एक-एक प्रांत घेत चालले आहेत त्याकडे पाहता चिंताजनक परिस्थिती आहेच. तालिबानी वर्चस्व असलेल्या शहरांतील नागरिकांनी काबुलमध्ये आसरा घेतला असून ते तिथे रस्त्यांवर, उद्यानांत राहत आहेत. ही परिस्थिती पाहता सरकारला राजधानीसह काही शहरांचं संरक्षण करणं गरजेचं आहे.

  इथे आहे अफगाणी सरकारचं नियंत्रण -

  गझनीतील प्रांत परिषदेचे सदस्य अमानुल्ला कामरानी म्हणाले, ‘शहराबाहेरच्या दोन तळांवर अजूनही सरकारी यंत्रणांचं नियंत्रण आहे. सध्या देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या लष्कर गाह या शहरामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे.’ हेलमंदच्या खासदार नसिमा नियाझी म्हणाल्या, ‘बुधवारी दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या माध्यमातून राजधानीतल्या क्षेत्रीय पोलीस मुख्यालयाला लक्ष्य केलं. गुरुवारी तालिबानने मुख्यालयावर कब्जा केला आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांपुढे आत्मसमर्पण केलं.’

  अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण;कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन

  UN च्या म्हणण्यानुसार 4 लाख नागरिक स्थलांतरित -

  अफगाणिस्तानातील (Afghanistan) दहशतवाद्यांच्या कारवाईमुळे मे महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरित झाले होते. आतापर्यंत सुमारे 4 लाख नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच साधारण 3 लाख 90 हजार नागरिकांना या दहशतवादी हल्ल्यांमुळे स्थलांतरित व्हावं लागलं आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुतारेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

  First published: