नवी दिल्ली, 28 जून : G-7 बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. (pm modi Germany tour) काल सोमवारी (दि.27) त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. जर्मनीत राहणाऱ्या भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्युनिकमध्ये परदेशी भारतीयांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पीएम मोदींनी आपल्या भाषणात भारताच्या कामगिरीचा उल्लेख केला. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (A video of a meeting between US President Joe Biden and Prime Minister Modi has gone viral)
दरम्यान, जर्मनीमध्ये जागतिक नेत्यांसोबत प्रसिद्ध झालेल्या फोटोंमुळे पंतप्रधान मोदींबद्दलचा आदर आणि भारताच्या वाढत्या उंचीचा ठसा दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची जर्मनीत भेट घेतली.
हे ही वाचा : संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांनीच दिला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दुसरीकडे जात होते दरम्यान त्यांना पंतप्रधान मोदी दिसल्यानंतर बायडेन आर्वजून भेटण्यासाठी आले. पीएम मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी बोलत होते, त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटायला पोहोचले आणि त्यांना मागून हात लावत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी त्यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते, मात्र बायडेन थेट पंतप्रधान मोदींकडे गेल्याने या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.
#WATCH | US President Joe Biden walked up to Prime Minister Narendra Modi to greet him ahead of the G7 Summit at Schloss Elmau in Germany. (Source: Reuters) pic.twitter.com/gkZisfe6sl
— ANI (@ANI) June 27, 2022
जर्मनीमध्ये जागतिक नेत्यांसोबत पीएम मोदी ज्यापद्धतीने ते वावरत आहेत यातून त्यांची बाहेरच्या देशातील नेत्यांसोबत घनीष्ट मैत्री असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर आणखी एक फोटो चर्चेत आहे. पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीचा हे दोघे चहा घेत गप्पा मारतानाच्या फोटोची चर्चा होत आहे. दरम्यान रविवारी पंतप्रधान मोदींनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांची भेट घेतली होती. दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे.
हे ही वाचा : 'जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे दिले असते'; शिवसेनेनं बंडखोरांना पुन्हा सुनावलं
पीएम मोदींनी म्युनिचमध्ये अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या विषयावर चर्चा केली. पंतप्रधान मोदी G-7 शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. शिखर परिषदेत ऊर्जा, अन्न सुरक्षा, दहशतवाद, पर्यावरण आणि लोकशाही या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
G7 शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान 28 जून 2022 रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) ला भेट देतील. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाले यासाठी पंतप्रधान मोदी यूएईचे माजी अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. मागच्या महिन्याच्या 13 तारखेला शेख खलिफा यांचे निधन झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, Pm modi, Pm modi photos, President of america, United States of America