Home /News /maharashtra /

संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांनीच दिला इशारा

संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांनीच दिला इशारा

राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला.

    यवतमाळ, 28 जून :  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेच ढग निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सोबत आले आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड (shiv sena mla sanjay rathod) यांचाही समावेश आहे. आता शिवसैनिकांनीच संजय राठोड यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे. पूजा चव्हाण  आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. अलीकडे संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात घरवापसी करणार अशी चर्चा रंगली होती. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि संजय राठोड गुवाहाटीमध्ये दाखल झाले. त्यामुळे आजपर्यंत संजय राठोड यांचं समर्थन करणारे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू, या प्रकरणातली 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. (पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे एक ड्रिंक आहे फायदेशीर; आश्चर्यकारक आहेत परिणाम) पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली, पूजा चव्हाण वर त्याने कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती असून त्याचा पर्दाफाश करू असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितलं. राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला. संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या