मराठी बातम्या /बातम्या /विदेश /US Election 2020: इथं जो बायडन झाले राष्ट्राध्यक्ष, तिकडे ट्रम्प पाहा काय करत होते; VIDEO VIRAL

US Election 2020: इथं जो बायडन झाले राष्ट्राध्यक्ष, तिकडे ट्रम्प पाहा काय करत होते; VIDEO VIRAL

आता सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. दरम्यान या निकालानंतरही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसत नाही आहे.

आता सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. दरम्यान या निकालानंतरही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसत नाही आहे.

आता सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. दरम्यान या निकालानंतरही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसत नाही आहे.

वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांना निर्णायक आघाडी मिळाली आणि निकाल जाहीर झाला. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. दरम्यान या निकालानंतरही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसत नाही आहे. जो बायडन (Joe Biden) विजयाच्या अगदी काही क्षण दूर असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मतांमध्ये घोळ झाल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली आणि त्यामुळे निकाल रखडला होता.

साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनी लागला, यावेळी ट्रम्प यांनी बायडन यांनी आघाडी घेतल्यानंतर सतत त्यांच्यावर आरोप केले. मात्र जेव्हा अमेरिकेच्या मीडियानं बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषणा केली तेव्हा ट्रम्प व्हर्जिनियामध्ये गोल्फ खेळत होते.

वाचा-We did it Joe! कमला हॅरिस यांना आवरले नाहीत अश्रू अध्यक्षांना बातमी कशी दिली?

वाचा-जो बायडन यांचं आयुष्य आहे दु:खाने भरलेलं, एकदा केला होता आत्महत्येचा विचार

शनिवारी एकीकडे संपूर्ण देश बायडन यांना शुभेच्छा देत असताना ट्रम्प मात्र गोल्फ खेळण्यात व्यस्त होते. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

वाचा-अमेरिकत पहिल्यांदा घडणार या 3 गोष्टी; कमला हॅरिस यांनी घडवला इतिहास

पंतप्रधान मोदींना बायडन यांना दिल्या शुभेच्छा

जो बायडन यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. टाळ्या, थाळ्या, बिगुल आणि वेगवेगळी वाद्य वाजवून हा जल्लोष साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बायडन यांना शुभेच्छा देखील दिल्या. या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले. अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत-अमेरिकन संबंध आणखी मजबूत केले पाहिजेत. ते म्हणाले, मला तुमच्याबरोबर भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर घेऊन जायचे आहेत.

First published:

Tags: Donald Trump, Joe biden, US elections