मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकत पहिल्यांदा घडणार या 3 गोष्टी; भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी घडवला इतिहास

अमेरिकत पहिल्यांदा घडणार या 3 गोष्टी; भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी घडवला इतिहास

US Election 2020 : अमेरिकन इतिहासात पहिल्यांदाच एक कृष्णवर्णीय स्त्री तेही आफ्रिकन - इंडियन वंशाची उपराष्ट्राध्यक्षपदी पोहोचली आहे. कमला हॅरिस यांच्यामुळे भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेत दोन क्रमांकाचं पद मिळालं आहे.

US Election 2020 : अमेरिकन इतिहासात पहिल्यांदाच एक कृष्णवर्णीय स्त्री तेही आफ्रिकन - इंडियन वंशाची उपराष्ट्राध्यक्षपदी पोहोचली आहे. कमला हॅरिस यांच्यामुळे भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेत दोन क्रमांकाचं पद मिळालं आहे.

US Election 2020 : अमेरिकन इतिहासात पहिल्यांदाच एक कृष्णवर्णीय स्त्री तेही आफ्रिकन - इंडियन वंशाची उपराष्ट्राध्यक्षपदी पोहोचली आहे. कमला हॅरिस यांच्यामुळे भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेत दोन क्रमांकाचं पद मिळालं आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
 वॉशिंग्टन, 7 नोव्हेंबर : जो बायडन अमेरिकेचे 46  वे अध्यक्ष होणार हे आता निश्चित झालं आहे. रखडलेले निवडणूक निकाल अखेर जाहीर झाले आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. त्यांच्याबरोबर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्य होतील. या पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या. कमला हॅरिस यांची आई भारतीय आहे. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारली आहे. कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. श्यामला गोपालन मूळच्या भारतीय आहेत, तर वडील डोनाल्ड हॅरिस आफ्रिकेतून स्थलांतरित झाले आहेत. वर दिसणाऱ्या फोटोमध्ये आई श्यामला यांच्यासह कमला हॅरिस आणि त्यांची बहीण माया दिसत आहेत. माया हॅरिस यांच्या Twitter अकाउंटवरचा हा फोटो आहे. कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या Kamala Harris यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या. वर्षांच्या कमला डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. कॅलिफोर्नियातील ऑकलँडमध्ये त्यांचा झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. कमला हॅरिस निष्णात वकील आहेत. स्थलांतरितांचे प्रश्न त्या हिरीरीने मांडतात. 1990 मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियातील अ‍ॅलमेंडा काउंटीच्या डेप्यूटी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहिले आहे. 1998मध्ये त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मॅनेजिंग अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहिले. 2011 मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल पदावर कार्यरत होत्या. कमला हॅरिस यांचा काश्मीरच्या 370 कलम काढल्याला आहे विरोध गेल्या वर्षी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रमिला जयपाल यांचा समावेश असणाऱ्या खासदारांच्या गटाला भेटण्यासही नकार दिला होता. याचं कारण होतं प्रमिला जयपाल यांचा काश्मीरविषयी दृष्टिकोन. प्रमिला जयपाल डेमोक्रॅटिक पक्षाच्या काँग्रेसमन आहेत. 370 वं कलम हटवल्यानंतर जयपाल यांनी त्याविरुद्ध जाहीर भूमिका घेतली होती. भारताने काश्मीरमध्ये घातलेले निर्बंध मागे घ्यावेत यासाठी अमेरिकी काँग्रेसमध्ये विधेयक मांडणाऱ्या प्रमिला जयपालच होत्या. त्यांच्या या विधेयकाला कमला हॅरिस यांच्यासह प्रमुख डेमोक्रॅटिक खासदारांनी पाठिंबा दिला होता. भारतीय दूतावास लागला कामाला भारताचे राजदूत तरणसिंग संधू यांनी आफ्रिकन अमेरिकन काँग्रेसमनशी संधान बांधायला सुरुवात केली आहे. उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता असणाऱ्या कमला हॅरिस या गटातल्या. कमला हॅरिस यांचे वडील जमैकन तर आई मूळची भारतीय. त्यामुळे उपराष्ट्राध्यक्ष भारताबरोबरच्या संबंधांमधला प्रमुख दुवा ठरू शकतात. संधू यांच्या जाहीरपणे झालेल्या काही बैठकांपैकी बऱ्याच डेमोक्रॅटिक खासदारांबरोबरच्या आहेत. त्यामध्ये ते भारतीय- अमेरिकन डेमोक्रॅट अॅमी बेरा यांनाही भेटले. बेरा आशियाविषयक उपसमितीचे अध्यक्ष होते. या भेटीनंतर संधू यांनी ट्वीटही केलं होतं. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याविषयी आणि Covid साथीच्या सुयोग्य नियोजनाविषयी सहकार्यासंबंधी चर्चा झाली, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अमेरिकेन काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अॅमी बेरा निवडून येण्याची शक्यता आहे. बेरा यांच्याखेरीज आणखी एका भारतीय वंशाच्या डेमॉक्रेटिक उमेदवाराने US काँग्रेसमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांचं नाव आहे प्रमिला जयपाल. पण या जयपाल बाईंबरोबरचे संबंध मोदी सरकारच्या फायद्याचे नाहीत. अडचणीचे मुद्दे काश्मीर मुद्द्याखेरीज ट्रम्प हरल्यानंतर मोदी सरकारची अडचण करू शकेल अशी एक घोषणा आता काही जण आठवत आहेत. मोदी भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा आणि Howdy Modi या अमेरिकेतल्या कार्यक्मातदेखील अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली जात होती. मोदींच्या प्रचारयंत्रणेची ही घोषणा ट्रम्प यांचाही प्रचार करणारी ठरत असल्याने विरोधी पक्ष दुखावले जातील. आता डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आली तर भारताची ही घोषणा अडचणीची ठरू शकेल, अशी भीती त्या वेळी व्यक्त झाली होती.
First published:

Tags: US elections

पुढील बातम्या