मराठी बातम्या /बातम्या /विदेश /We did it Joe! कमला हॅरिस यांना आवरले नाहीत अश्रू अध्यक्षांना बातमी कशी दिली? पाहा VIDEO

We did it Joe! कमला हॅरिस यांना आवरले नाहीत अश्रू अध्यक्षांना बातमी कशी दिली? पाहा VIDEO

राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी शेअर करण्यासाठी उपराष्ट्रपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस यांनी आनंदाने उचंबळून आलेल्या शब्दांत जो बायडन यांना फोन केला..  VIDEO होतोय व्हायरल

राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी शेअर करण्यासाठी उपराष्ट्रपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस यांनी आनंदाने उचंबळून आलेल्या शब्दांत जो बायडन यांना फोन केला.. VIDEO होतोय व्हायरल

राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी शेअर करण्यासाठी उपराष्ट्रपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस यांनी आनंदाने उचंबळून आलेल्या शब्दांत जो बायडन यांना फोन केला.. VIDEO होतोय व्हायरल

वॉशिंग्टन, 7 नोव्हेंबर : अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांना निर्णायक आघाडी मिळाली आणि निकाल जाहीर झाला. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी निकालानंतर पहिला फोन जो बायडन यांना केल्याचा VIDEO व्हायरल होत आहे.  We did it Joe, असं म्हणताना त्यांच्या भावना उचंबळून आलेल्या या VIDEO मध्ये स्पष्ट दिसत आहेत. कमला हॅरिस यांनी स्वतःच हा VIDEO शेअर केला आहे आणि नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तो तातडीने ReTweet सुद्धा केला आहे.

कमला हॅरिस आता उपराष्ट्राध्य होतील. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या महिल्या अमेरिकन महिला आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेतल्या दोन नंबरच्या पदापर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. जो बायडन अमेरिकेचे 46  वे अध्यक्ष होणार हे आता निश्चित झालं आहे. रखडलेले निवडणूक निकाल अखेर जाहीर झाले आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल समोर आले, तसा पहिला फोन कमला यांनी जो बायडन यांना केला. त्या फोनवर जो बायडन यांच्याशी बोलतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

उपराष्ट्राध्यपदावर निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या. कमला हॅरिस यांची आई भारतीय आहे. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारली आहे.

कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. श्यामला गोपालन मूळच्या भारतीय आहेत, तर वडील डोनाल्ड हॅरिस आफ्रिकेतून स्थलांतरित झाले आहेत. वर दिसणाऱ्या फोटोमध्ये आई श्यामला यांच्यासह कमला हॅरिस आणि त्यांची बहीण माया दिसत आहेत. माया हॅरिस यांच्या Twitter अकाउंटवरचा हा फोटो आहे.

कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या Kamala Harris यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या. वर्षांच्या कमला डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. कॅलिफोर्नियातील ऑकलँडमध्ये त्यांचा झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. कमला हॅरिस निष्णात वकील आहेत.

First published:
top videos

    Tags: US elections