US Election 2020: जो बायडन यांचं आयुष्य आहे दु:खाने भरलेलं, केला होता आत्महत्येचाही विचार

US Election 2020: जो बायडन यांचं आयुष्य आहे दु:खाने भरलेलं, केला होता आत्महत्येचाही विचार

1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर झाले होते. त्या आधी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

वॉशिंग्टन 7 नोव्हेंबर: जगात अमेरिकेचं अध्यक्षपद (President of America) हे सगळ्यात महत्त्वाचं सत्ता केंद्र समजलं जातं. जो बायडन (Joe biden) हे त्या पदाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. मीच जिंकणार अशी गर्जना करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा ते ऐतिहासिक पराभव करतील अशी शक्यता आहे. गेली अनेक दशकं राजकारणात असलेल्या जो यांच्याविषयी आता जगभर चर्चा केलीय जातेय. मात्र त्यांचं खासगी आयुष्य हे अतिशय दु:खाने भरलेलं आहे. सतत येणाऱ्या संकटामुळे त्यांच्या मनात कधी काळी आत्महत्येचेही विचार आले होते.

77 वर्षांच्या बायडन यांच्यावर गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशझोत असला तरी त्यांनी आयुष्याच्या सुरूवातीला अतिशय कष्टात दिवस काढले आहेत. बायडन यांचे मित्र जिम कॅनडी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जो यांनी जे कष्ट भोगले ते कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. त्यामुळे ते एवढे खंबीर बनले की एकदा ठरवल्यावर ते ती गोष्ट केल्याशीवाय राहात नाहीत.

कोळशांच्या खाणी आणि मोठ मोठाली यंत्र यांच्या सहवासात त्यांचं बालपण कष्टात गेलं होतं. लहान असताना बोलण्यात ते अडखळत असत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा अपमानही केला होता. नंतर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. 'प्रॉमिस टू कीप' हे त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे.

US Election 2020 : बायडन- कमला हॅरिस यांच्याशी संबंध वाढवण्यासाठी मोदींचा प्लॅन

1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर झाले होते. त्या आधी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बियू आणि हंटर ही त्यांची मुलंही त्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर बायडन कोलमडून गेले होते. त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार घोळत होते. आता जगण्यात अर्थच राहिलेला नाही त्यामुळे जगून तरी काय फायदा असं त्यांना वाटत असे. मात्र या नैराश्यावर मात करत ते पुन्हा उभे राहिले.

US Election : जो बायडन की डोनाल्ड ट्रम्प? राष्ट्राध्यक्षपदावरून ट्वीटरवर घमासान

नंतर बराक ओबामा यांचे ते जवळचे सहकारी झाले. ओबामा अध्यक्ष असताना बायडन हे उपाध्यक्ष होते. 2015मध्ये त्यांचा मुलगा बियू याचा ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा हंटर याला कोकेन बाळगल्या प्रकरणी नौदलातून काढून टाकण्यात आलं होतं. 1988मध्ये ते अर्धांग वायूच्या आजारातूनही बाहेर आले. अशा अनेक संकटावर मात करत आता बायडेन यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 7, 2020, 6:58 PM IST

ताज्या बातम्या