US Election 2020 : काय आहे रोबोकॉल ज्यानं वाढवली ट्रम्प आणि बायडन यांची चिंता, निकालांमध्ये होऊ शकतात बदल

US Election 2020 : काय आहे रोबोकॉल ज्यानं वाढवली ट्रम्प आणि बायडन यांची चिंता, निकालांमध्ये होऊ शकतात बदल

अमेरिकेतील अनेक मतदारांना रोबोकॉलच्या (robocall) माध्यमातून कोरोनापासून बचावासाठी मतदानाला जाऊ नका असं आवाहन करण्यात आलं होतं अशा बातम्या येत आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर : अमेरिकेत मतदान (US Election 2020 ) पूर्ण होऊन दोन दिवस झाले तरीही निकाल लागलेला नाही. सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Baiden) आघाडीवर असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर आहेत. निवडणुकीत घोटाळा झाल्याचे ओरोप ट्रम्प यांनी केले आहेत. अमेरिकेतील अनेक मतदारांना रोबोकॉलच्या (robocall) माध्यमातून कोरोनापासून बचावासाठी मतदानाला जाऊ नका असं आवाहन करण्यात आलं होतं अशा बातम्या येत आहेत. एखाद्या विशिष्ट पक्षाच्या मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी त्यांना केलेल्या फोन कॉल्सना रोबोकॉल म्हणतात.

घोटाळा झालाय का?

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला असून यावेळी निवडणूक निकालांत कोर्टाला मध्यस्थी करावी लागेल अशी चिन्हं आहेत. घोटाळा झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत पण कुणी कोणत्या पक्षाविरुद्ध घोटाळा केलाय याचं चित्र स्पष्ट नाही. या घोटळ्यांचाच भाग म्हणजे रोबोकॉल. हे फसवे कॉल असतात जे विशिष्ट उद्दिष्टासाठी केले जातात.

वाचा-बिनबुडाचे आरोप सुरू झाल्याने ट्रम्प यांचं LIVE भाषण वृत्तवाहिन्यांनी थांबवलं

रोबोकॉल्सद्वारे काय सांगितलं गेलं?

मंगळवारी वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापलेल्या एका बातमीत म्हटलंय की अँटिरोबोकॉल सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या यू-मेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील 90 टक्के एरिया कोड्समध्ये मतदानासंबंधी रोबोकॉल आले आहेत. दुसऱ्या पक्षाची मतं वाढावीत म्हणून एका पक्षाच्या मतदारांना रोखण्यासाठी हे कॉल केले गेल्याचं बातमीत म्हटलंय. त्यांच्या राज्यात कोरोनाची भयावह स्थिती असल्यामुळे मतदारांनी मतदानाला जाऊ नये असं आवाहन या रोबोकॉलमध्ये करण्यात आलं होतं.

आकडेवारी काय सांगते?

अनेक वर्षांपासून रोबोकॉलचा वापर निवडणुकीत केला जातो पण यावर्षी विशेष नियोजन करून त्यांचा वापर करण्यात आला आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात एक कोटी रोबोकॉलच्या माध्यमातून लोकांना मतदान न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण त्यामुळे किती लोकांनी मतदान केलं नाही हा आकडा अजून कळालेला नाही.

वाचा-अमेरिकेतही भारतीयांचा डंका! 5 महिलांसह 12 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी

काळजीपूर्वक करतात रोबोकॉल

अमेरिकी गुप्तचर संस्था एफबीआयने या रोबोकॉलचा तपास सुरू केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वार करून हे कॉल केले जातात त्यामुळे कॉलरचं लोकेशन शोधता येणं अवघड असतं. मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांचा आवाज आणि शैली वापरून कॉल केला जातो जेणेकरून त्यावर त्याचा विश्वास बसतो. त्यामुळे हा कॉल खरा मानून अनेकांनी मतदान केलं नसेल अशी मोठी शक्यता आहे.

अमेरिकेसाठी नवं काही नाही

अमेरिकेत अनेक वर्षांपासून मतांमधील फरक वाढवण्यासाठी रोबोकॉल केले जातात. हा कॉम्प्युटराइज्ड कॉल टेलिमार्केटिंगसाठीही नेहमी वापरला जातो पण त्याचै गैरवापर वाढला आहे. इतर अनेक कारणांसीठीही रोबोकॉल केले जातात.

वाचा-बायडन यांचं 'मुंबई' कनेक्शन आलं समोर, भारतात निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

पैसे उकळण्यासाठी वापर

बनावट कंपन्या रोबोकॉल करून लोकांकडून पैसे उकळतात आणि नंतर घोटाळा करतात. बरेचदा हा कॉल करून समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात तुम्ही असं केलं नाहीत तर तसं होईल अशी इशारा देणारी भाषा वापरली जाते. त्यामुळे कॉलरच्या अंदाजानुसार ती व्यक्ती कृती करते आणि तिची फसवूक होते. त्या व्यक्तीची गुप्त माहिती चोरली जाते. अमेरिकेत वाढत्या रोबोकॉल्समुळे 2019 मध्ये कडक नियम तयार करण्यात आले. तिथल्या न्याय विभागाचं मत आहे की परदेशांतून अमेरिकी नागरिकांना फोन कॉल येतात ज्यातून सरकारी कारवाईची धमकी दिली जाते. त्यामुळे सावध होऊन नागरिक काहीतरी पाऊल उचलतात त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होते. यामुळे अमेरिकेतील ज्येष्ठ आणि तंत्रज्ञानाची अधिक माहिती नसलेल्या अनेकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 6, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading