US Election Result : अमेरिकेतही भारतीयांचा डंका! 5 महिलांसह 12 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी

US Election Result : अमेरिकेतही भारतीयांचा डंका! 5 महिलांसह 12 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी

अमेरिकेत स्टेट इलेक्शनही झालं असून त्यामध्ये एकूण 12 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी झाले असून, त्यात 5 महिलांचा समावेश आहे. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये (काँग्रेस) भारतीय वंशाचे चार उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी (US Election Result 2020) अजून सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) बहुमताच्या 270 या आकड्याजवळ आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत स्टेट इलेक्शनही झालं असून त्यामध्ये एकूण 12 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी झाले असून, त्यात 5 महिलांचा समावेश आहे. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये (काँग्रेस) भारतीय वंशाचे चार उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत. काँग्रेसमधील भारतीय वंशीय सदस्यांच्या गटाला सामोसा कॉकस म्हटलं जातं.

डॉ. एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती हे चौघं काँग्रेससाठी निवडले गेले आहेत. भारतीय वंशाचे आणखी तीन उमेदवार आघाडीवर आहेत. त्यात अरिझोनातील डॉ. हीरल टिपरेनई, न्यूजर्सी स्टेट युनिट रुपेंद्र मेहता, पेनसिल्व्हेनियाच्या ऑडिटर जनरलच्या निवडणुकीतील नीना अहम यांचा समावेश आहे.

स्टेट इलेक्शनमध्ये भारतीयांचा विजय ओहियोमधील स्टेट सिनेटसाठी नीरज अंतानी विजयी झाले आहेत. या सिनेटमध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय आहेत.

(वाचा - बायडन यांचं 'मुंबई' कनेक्शन आलं समोर, भारतात निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत)

नीरज आता 29 वर्षांचे असून केवळ 23 व्या वर्षी हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ही निवडणूक जिंकणारे ते सर्वांत लहान वयाचे भारतीय वशांचे अमेरिकी ठरले होते. नॉर्थ कॅरोलिना स्टेट सिनेटमध्ये जय चौधरींनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. अरिझोनात अमीश शहा, पेनसिल्व्हेनियात निखिल सावल, मिशिगनमध्ये राजीव पुरी, न्यूयॉर्कमध्ये जर्मी कोने, कॅलिफोर्नियात एश कालरा आणि टेक्सास डिस्ट्रिक्टमध्ये रवी सेंदिल यांनी स्टेट सिनेट निवडणुकीत विजय मिळवला आहे.

या आहेत विजयी महिला

पद्मा कुप्पा (मिशिगन स्टेट हाउस) – पद्मा कुप्पा या डेमोक्रॅटिक पक्षाच्या असून मिशिगन स्टेट हाउससाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या हिंदू प्रवासी आहेत. त्यांना मिशिगनमध्ये असिस्टंट व्हिप म्हणून नॉमिनेट केलं होतं.

(वाचा - कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? 12 नोव्हेंबपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा)

जेनिफर राजकुमार (न्यूयॉर्क स्टेट असेंब्ली) – भारतीय वंशाच्या अमेरिकी जेनिफर राजकुमार या न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये निवडून आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती आहेत. जेनिफर वकील असून दीर्घकाळ समाज कार्य करत आहेत.

केशा राम (वर्मोंट स्टेट सिनेट) – केशा राम यांचा जन्म 1986 साली झाला. त्यांचे वडिल ज्यु असून आई हिंदू आहे आणि तरुण इंडियन-अमेरिकन राजकारणी म्हणून त्यांना लोक ओळखतात.

(वाचा - US Election 2020: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना किती मिळतो पगार?)

निमा कुलकर्णी (केंटुकी स्टेट हाउस) – निमा यांनी मिशिगन राज्यातील असेंब्लीची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या कुलकर्णी इमिग्रेशन अटर्नी म्हणून काम करतात.

वंदना स्लेटर (वॉशिंग्टन स्टेट हाउस) – वंदना स्लेटर या कॅनेडियन अमेरिकी आहेत. शीख समुदायात वंदना आणि त्यांचं कुटुंब लोकप्रिय आहे. वंदना यांचे वडिल डॉक्टर आहेत आणि त्यांनी फार्मसीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी पब्लिक पॉलिसीमध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 6, 2020, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading