वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक (US presidential election result) या वेळी खूपच अटीतटीची होत आहे. निकाल अद्यापही स्पष्ट झालेला नाही, पण राष्ट्राध्यश्र ट्रम्प (Donald Trump) यांना पराभव दिसू लागला आहे. जो बायडन (Joe Biden) 270 या बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचत असल्याचं दिसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप करणं सुरू केलं आहे. मतदानाच्या दिवसानंतर गुरुवारी ते प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर LIVE भाषण करत होते. पण त्यांनी निवडणूक खोटी आहे, बनावट मतं मोजली जात आहेत, असे बिनबुडाचे आणि बेछूट आरोप करायला सुरुवात केल्यानंतर काही अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी त्यांचं भाषण LIVE दाखवणं बंद केलं.
बेकायदेशीरपणे मतदान झालं, निवडणूक आमच्याकडून हिरावून घेतली, असे आरोप कुठल्याही पुराव्यानिशी ट्रम्प यांनी भाषणात केले. असे बिनबुडाचे दावे सुरू झाल्याने ABC, NBC सारख्या वाहिन्यांनी तत्काळ त्यांचं LIVE टेलिकास्ट बंद केलं.
CNN चे जेक टॅपर म्हणाले, "अमेरिकेसाठी ही अत्यंत दुःखदायक रात्र आबहे. आमचेच राष्ट्राध्यक्ष नागरिकांवर खोटे आरोप करत आहेत."
अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक या वेळी खूपच अटीतटीची होत आहे. निकाल अद्यापही स्पष्ट झालेला नाही. 6 राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे आणि त्यात सर्वात चुरशीची लढत सुरू आहे जॉर्जिया स्टेटमध्ये. या राज्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांना मिळालेल्या मतांमध्ये अगदी कमी फरक आहे. मतमोजणी अद्याप संपलेली नसली, तरी दोघांना मिळालेल्या मतांमध्ये आता अवघ्या काहीशे मतांचा फरक उरला आहे.
व्हाइट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी 270चा आकडा गाठावा लागतो. सध्या जो बायडन या शर्यतीत पुढे आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार ते 253 वर पोहोचले आहेत, तर ट्रम्प यांनी 214 आकडा गाठला आहे. आता नॉर्थ कॅरोलिनाचा निकाल12 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. पण जॉर्जिया जे रिपब्लिकन पक्षाचं राज्य मानलं जात होतं, तिथेच डोनाल्ड ट्रम्प यांना बायडन यांनी कडवी लढत दिली आहे. ट्रम्प आघाडीवर असले तरी, दोघांमधल्या मतांचा फरक 700 ते 800 एवढाच उरला आहे. उर्वरित अॅरिझोना, नेवाडा या दोन राज्यांत बायडेन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर अलास्का आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रम्प जिंकण्याची शक्यता आहे.
5 राज्यांचे लेटेस्ट अपडेट्स
ट्रम्प यांच्या समर्थकांनी पराभव दिसू लागलाच हुल्लडबाजी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी ते मजमोजणी थांबवण्याची मागणी करत अडथळे आणत आहेत. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निवडणूकच खोटी ठरवत बिनबुडाचे आरोप करत आहेत.