वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election Result 2020) मतमोजणीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. तर अजून 5 राज्यांचा निकाल अद्यापही लागणं बाकी आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन (Joe Biden) हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. डेमोक्रेट पक्षाचे बायडन हे ज्येष्ठ नेते आहेत. 1972 मध्ये बायडन प्रथम सिनेटर म्हणून निवडून आले होते. मात्र आता बायडन यांचे भारतीय कनेक्शन समोर आलं आहेत. याबाबत त्यांनी स्वतः काही वर्षांपूर्वी खुलासा केला होता.
डेमोक्रॅटिक उमेदवार असलेले बायडन 2013 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत एका भाषणादरम्यान आपले भारतीय कनेक्शन उघड केले. 1972 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा सिनेट सदस्य झाले तेव्हा त्यांना मुंबईत राहणाऱ्या एका बायडन नावाच्या वक्तीनं पत्र लिहिले होते. मुंबईस्थित बायडन यांनी त्यांना सांगितले की, दोघांचे पूर्वज एकच आहेत. या पत्राद्वारे त्यांना माहिती देण्यात आली की त्याचे पूर्वज 18 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होते.
वाचा-निवडणुकीदरम्यान राडा! 24 वर्षीय तरुणी पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर थुंकली
भारतात निवडणूक लढवण्याची होती इच्छा
2015मध्ये वॉशिंग्टनमध्ये इंडो-यूएस फोरमच्या बैठकीत त्यांनी पुन्हा आपल्या भारतीय संबंधाचा उल्लेख केला. त्याने सांगितले की त्याच्या पूर्वजांनी बहुधा एका भारतीय महिलेशी लग्न केले होते, ज्यांचे कुटुंबीय इथे आहेत. मुंबईत बायडन आडनावाचे पाच लोक होते, अशी माहिती त्यांनी एका पत्रकाराला दिली. तेव्हा बिडेन यांनीही अशी भूमिका घेतली होती की ते भारतातही निवडणुका लढवू शकतात.
वाचा-कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? 12 नोव्हेंबपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा
12 नोव्हेंबरला कळणार कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजूनही 5 राज्यांची मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो असा कयास आहे. अमेरिकेत एकूण 50 राज्यांपैकी 45 राज्यांचा निकाल आला आहे. तर पेन्सिलवेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिन या उर्वरित 5 राज्यांची मतमोजणी 6, 9 आणि 12 नोव्हेंबरपर्यंत होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीत अफरातफर झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि न्यायालयात धाव घेतली त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. जर ट्रम्प यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर त्याचा निकाल 12 नोव्हेंबरला अधिकृतपणे येईल असा कयास आहे.