मॉस्को, 19 मार्च : युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या 1000 वैयक्तिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. त्यांच्या जागी नवीन लोकांची भरती करण्यात आली आहे. रशियन मीडियानुसार, पुतिन यांना विष देऊन त्यांची हत्या केली जाण्याचा संशय आहे. अलीकडच्या गुप्तचर माहितीनंतर पुतिन खूपच घाबरले आहेत.
रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियामध्ये त्यांच्याविरोधात विशेष ऑपरेशन सुरू केलं जाऊ शकतं. काही लोक देशद्रोही असल्यानं ते त्यांच्याविरुद्ध खुनाचा कट रचू शकतात.
हे वाचा - युक्रेनवर डागलेलं क्षेपणास्त्र हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली
डेली बीस्टचे संपादक क्रेग कोपेटस म्हणतात की, पुतिन यांना अन्नातून विष दिलं जाण्याचा शक्यता आहे, असं त्यांना सांगण्यात आलंय. ते म्हणाले की, रशियामध्ये एखाद्या व्यक्तीला मारण्याची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे विष देऊन मारणं. तसं पुतिन यांनी काहीही खाण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. तरीही, पुतिन यांनी त्यांच्या वैयक्तिक कर्मचार्यांपैकी 1000 लोकांना पूर्णपणे बदललं आहे. काढून टाकलेल्यांमध्ये सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी आणि खाजगी सचिवांचाही समावेश आहे.
हे वाचा - पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर अंतर्गत बंडाळीची टांगती तलवार
रशियाला मदत करण्यावरून अमेरिकेची चीनला धमकी
युक्रेनच्या शहरांवर भयानक हल्ले करणाऱ्या रशियाला चीननं मदत देण्याचे ठरवलं तर त्याचे वाईट परिणाम बीजिंगला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांना दिला आहे. दोघांमध्ये सुमारे 110 मिनिटे व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण झालं. या चर्चेत अमेरिका-चीन संबंध, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. बिडेन यांनी रशियावरील निर्बंधांसह हल्ले रोखणं आणि त्यांना प्रतिसाद देणं या उपायांवरही चर्चा केली. चीननं रशियाला मदत केल्यास चीनला काय परिणाम भोगावे लागतील, हे सांगण्यास व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने नकार दिला. चीनने आतापर्यंत हे युद्ध सुरू केल्याबद्दल रशियाचा निषेध करणं टाळलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine, Ukraine news