Home /News /videsh /

इम्रान खान यांच्या खुर्चीवर अंतर्गत बंडाळीची टांगती तलवार, अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदानाची खासदारांची धमकी

इम्रान खान यांच्या खुर्चीवर अंतर्गत बंडाळीची टांगती तलवार, अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदानाची खासदारांची धमकी

imran khan

imran khan

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांच्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Vote) आणला आहे. यानंतर खान यांच्याच पक्षातील सुमारे 24 खासदारांनी विरोधकांसोबत जाण्याची धमकी दिल्यानंतर खान यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 18 मार्च : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांच्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Vote) आणला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधानांच्या सत्ताधारी पक्षातल्या सुमारे 24 खासदारांनी त्यांच्याविरोधात म्हणजेच प्रस्तावाच्या बाजूनं मतदान करण्याची धमकी दिली आहे. यामुळं खान यांच्यासमोरील अडणींमध्ये खूप वाढ झाली आहे.पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात अविश्वास प्रस्ताव आणला. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावाबाबत नॅशनल असेंब्लीचं अधिवेशन 21 मार्चला बोलावलं जाऊ शकतं. यावर सभागृहात 28 मार्चला त्यावर मतदान होण्याची शक्यता आहे. यादरम्यान खान यांच्याच पक्षातील सुमारे 24 खासदारांनी विरोधकांसोबत जाण्याची धमकी दिल्यानंतर गुरुवारी खान यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून आलं. कारण संयुक्त विरोधी पक्षानं अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्यांच्या काही सरकारी सहयोगींनीही खान यांना लक्ष्य केलं. हे वाचा - युद्ध सुरू असतानाच Ukraineच्या राष्ट्रपतींना मिळू शकतं शांततेचं Nobel Prize 'वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात इम्रान खान अपयशी' असंतुष्ट खासदारांपैकी एक राजा रियाझ यांनी जिओ न्यूजला सांगितलं की, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात खान अपयशी ठरले आहेत. तर दुसरे खासदार नूर आलम खान यांनी समा न्यूजला सांगितलं की, त्यांच्या अनेक तक्रारी सरकारमध्ये ऐकल्या जात नाहीत. रियाझ म्हणाले, 'आम्ही 24 हून अधिक सदस्यांपैकी आहोत, जे सरकारच्या धोरणांवर खूश नाहीत.' नूर म्हणाले, 'माझ्या मतदारसंघात गॅस टंचाईचा मुद्दा मी अनेकदा मांडला, पण काहीही झालं नाही.' हे वाचा - रशियाला झटका! युरोपियन स्पेस एजन्सीने 8433 कोटी रुपयांच्या मिशनमधून काढलं बाहेर असंतुष्ट खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये थांबले आहेत. ही सिंध सरकारची मालमत्ता आहे आणि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) द्वारे चालवली जाते. सिंध सरकारमधील मंत्री आणि प्रवक्ते सईद गणी म्हणाले की, खासदारांना भीती वाटते की सरकार त्यांचं अपहरण करेल. डॉ. रमेश कुमार वांकवानी हेदेखील पीटीआय खासदारांपैकी एक आहेत जे सिंध हाऊसमध्ये राहत आहेत. डॉन न्यूजनं वांकवानी यांच्या हवाल्यानं म्हटलंय की, 'मला धमक्या आल्या होत्या. मी सिंधच्या मुख्यमंत्र्यांना येथे (सिंध हाऊस) एक खोली देण्याची विनंती केली होती.' त्याच वेळी, इम्रान खान सरकारनं सिंध सरकारवर पीटीआयच्या खासदारांचं अपहरण केल्याचा आरोप केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या