Home /News /videsh /

रशिया युक्रेन युद्ध : युक्रेनवर डागलेलं क्षेपणास्त्र हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली आणि अत्यंत प्राणघातक

रशिया युक्रेन युद्ध : युक्रेनवर डागलेलं क्षेपणास्त्र हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली आणि अत्यंत प्राणघातक

खुद्द रशियानंच किंजल क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्याबाबत तज्ज्ञांच्या मनात अजूनही शंका आहेत. प्राथमिक अहवालांवर विश्वास ठेवला जात असला तरी, किंजल कालिनिग्राडमध्ये तैनात होतं. हे पोलंड आणि लिथुआनियाच्या सीमेला लागून असलेलं बाल्टिक समुद्राचं क्षेत्र आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 मार्च : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (russia ukraine war) जसजसं पुढे सरकत आहे, तसतसं ते चिघळत चाललं आहे. रशियानं युक्रेनवर किंजल क्षेपणास्त्र (kinzhal missile) डागल्याचा दावा केला आहे. पश्चिम युक्रेनमधील शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं रशियानं म्हटलंय. अमेरिकेनं हिरोशिमावर टाकलेल्या फॅट मॅन बॉम्बपेक्षा किंजल क्षेपणास्त्र 33 पट अधिक अण्वस्त्रांचं पेलोड वाहून नेऊ शकतं, असं म्हटलं जातं. रशिया जेव्हा किंजल क्षेपणास्त्राची चाचणी घेत होता, तेव्हा ते गेम चेंजर (game changer kinzhal missile) असल्याचं म्हटलं जात होतं. आता युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियानं त्याचा वापर केल्यानं याच्यामुळं संघर्षाला कोणती दिशा मिळतेय, हे पाहायचं आहे. किंजल मिसाईल बद्दल सर्व काही 1 - किंजल हे हवेतून मारा करणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र (Russian nuclear-capable hypersonic aero-ballistic air-to-ground missile) आहे. त्याचा टप्पा (Range) 1500 ते 2000 किलोमीटर आहे. ते 480 किलो न्यूक्लियर पेलोड वाहून नेऊ शकतं. अमेरिकेनं हिरोशिमावर टाकलेल्या फॅट मॅन बॉम्बपेक्षा हे 33 पट जास्त आहे. २ - किंजल म्हणजे हिंदीत खंजीर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मार्च 2018 मध्ये किंजल क्षेपणास्त्राचं अनावरण केल्याचं सांगितलं जात आहे. किंजलची संकल्पना इस्कंदर-एम सारख्या कमी पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून निर्माण झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 3- प्रक्षेपणानंतर, किंजल ताशी 4900 किमी वेगानं वेग घेतं. त्याचा वेग 12 हजार 350 किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढू शकतो. 4- किंजल क्षेपणास्त्राची हल्ला करण्याची क्षमता अत्यंत धोकादायक असल्याचं मानलं जातं. ते खूप खोलवर मारा करू शकतं. 5- रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी किंजलचं वर्णन एक आदर्श शस्त्र असं केलं आहे. हे आवाजापेक्षा 10 पट वेगानं उड्डाण करू शकतं आणि हवाई संरक्षण यंत्रणा भेदण्याचीही क्षमता याच्यात आहे. तज्ज्ञांमध्ये मतभेद आता खुद्द रशियानंच किंजल क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्याबाबत तज्ज्ञांच्या मनात अजूनही शंका आहेत. प्राथमिक अहवालांवर विश्वास ठेवला जात असला तरी, किंजल कालिनिग्राडमध्ये तैनात होतं. हे पोलंड आणि लिथुआनियाच्या सीमेला लागून असलेलं बाल्टिक समुद्राचं क्षेत्र आहे. फेब्रुवारीमध्ये रशिया युक्रेनजवळ आपलं सैन्य तैनात करत होता.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Missile, Russia Ukraine

    पुढील बातम्या