लंडन, 28 डिसेंबर : आपल्यासोबत दुर्घटना व्हावी (Road Accident), आपला अपघात व्हावा, असं कुणालाच वाटत नाही. ज्या अपघाताला सर्वजण घाबरतात त्यात अपघाताला सामोरं जाणाऱ्या कपलला अपघात आवडला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतरही अपघात बरा असल्याचं या कपलचं म्हणणं आहे (Couple said road accident is good).
यूकेच्या हँस्टिंगमध्ये राहणारी 20 वर्षांचा लिआम पॅडघन (Liam Padghan) आणि 21 वर्षांची क्लो लीर (Chloe Leer) एकमेकांना डेट करत होते. एक दिवस ते दोघं फुटपाथवर चालत होते. त्यावेळी एका भरधाव कारने त्या दोघांना टक्कर मारली. अपघातात दोघंही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आज तकने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार लीर म्हणाली, "कारने आधी लियामला धडक दिली. तो खूप गंभीररित्या जखमी झाला होता. अपघातानंतर लियामचा गुडघा असा दिसत होता, जसं त्याचा पाय बाहेरच आला असावा. त्याच्या जांघेचं हाड बाहेर पडलं होतं. आता तो जगणार नाही असंच वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावरूनही रक्त वाहत होतं. मी घाबरले होते पण लियामची अवस्था पाहिल्यानंतर त्याच्यावरून माझी नजर हटेल इतक्या वेदना मला होत नव्हत्या"
हे वाचा - काहीच न करता हिला महिन्याला मिळतात दीड लाख रुपये; कमाईचा मार्ग पाहून हैराण व्हाल
लीरला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळाला. पण लियाम आठवडाभर रुग्णालयात होता. लीर त्याची खूप काळजी घ्यायची. काही कारणामुळे लियाम आणि लीर यांच्यात दुरावा आला होता पण या अपघातामुळे त्यांच्यातील दुरावा कमी झाला. कपलच्या मते, या अपघाताने त्यांचं नातं वाचवलं. आता ते दोघं इतके जवळ आलेत की लग्नाची तयारी करत आहेत.
लीर म्हणाली, "दुर्घटनेपूर्वी लियाम मला तो माझ्यावर किती प्रेम करत होता ते सांगत होता आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. जोपर्यंत तो ठिक होईल तोपर्यंत मी त्याची खूप काळजी घेतली आणि यामुळे आम्ही खूप जवळ आलो. जर दुर्घटना झाली नसती तर कदाचित आम्ही एकत्र नसतो"
हे वाचा - OMG! अजब प्रेमाची गजब कहाणी, पतीनं लावलं पत्नी आणि बॉयफ्रेंडचं लग्न
लियामच्या पायात रॉड टाकण्यात आली आहे. लियाम म्हणाला, "आम्ही बचावलो याचा आनंद मला आहे. आता आम्ही आधीपेक्षा जास्त जवळ आलो आहोत"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Couple, Relationship, Uk, World news