वॉशिंग्टन, 28 डिसेंबर : काहीच न करता आपल्याला पैसे मिळावे असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं शक्य नाही. पैसा कमावण्यासाठी काही ना काही करावं लागतंच. पण एका महिलेला मात्र काहीच न करताही पैसे मिळतात. फक्त मेसेजवर बोलण्यासाठीच एक व्यक्ती तिला महिन्याला तब्बल 1.5 लाख रुपये देते. इतकंच नव्हे तर महिलेच्या घराचा खर्चही तीच व्यक्ती करते (American woman gets 1 lakh rupees only for messaging).
सध्या परदेशात शुगर डॅडी (Sugar Daddy), शुगर मम्मी (Sugar Mommy) ही संकल्पना प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जास्त वय झालेले पुरुष किंवा महिला प्रेमाच्या शोधात असतात. आपल्यापेक्षा कमी वयाचा पार्टनर त्यांना पाहिजे असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या गरजा पूर्ण करतात. अमेरिकेच्या इंडियानामध्ये (Indiana, America) राहणाऱ्या बेली हंटरनेही (Bailey Hunter) असंच केलं.
मिरर वेबसाईटच्या रिपोर्टनुसार बेलीने @xbaileyhunter या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर सांगितलं की, गेल्या तीन वर्षांपासून ती आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीकडून भरपूर पैसे घेत आहेत आणि त्याबदल्यात ती खास काही करत नाही.
हे वाचा - OMG! 9 महिने नव्हे तर 35 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; रिपोर्ट पाहून डॉक्टर शॉक
बेलीने सांगितलं की, ती एका एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचं काम करत होती. तेव्हा एका व्यक्तीसोबत तिची भेट झाली. त्या व्यक्तीने तिला टिप म्हणून मोठी रक्कम दिली आणि आपलं बिझनेस कार्ड दिलं. बेलीने त्याचे आभार मानण्यासाठी त्याला फोन केला. त्यानंतर हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढला. ते एकमेकांशी दररोज बोलू लागले.
त्याचदरम्यान बेलीने आपलं घरही बदललं. तेव्हा या व्यक्तीने तिला पैशांची मदत केली. त्यानंतर तो दर महिन्याला तिला 1.5 लाख रुपये मदत म्हणून देतो. दोघंही मेजेसवर बोलतात. बेली आपल्या समस्या त्याला सांगते आणि मग तो पैसे पाठवतो. इतकंच नव्हे तर तो तिला फिरायलाही घेऊन जातो. महागडे गिफ्ट देतो.
बेलीने सांगितलं की, फक्त मेसेज करण्यासाठी तिला महिन्याला 1.5 लाख रुपये मिळायचे. तब्बल तीन वर्षे असंच सुरू होतो. जेव्हा बेलीला इंडियाना सोडून दुसऱ्या प्रांतात जावं लागलं. त्यावेळी तिने आपल्या मैत्रिणीचा त्या व्यक्तीशी संपर्क करन दिला जेणेकरून तो तिला मेसेज करेल.
हे वाचा - हटके गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!भावाला डोक्यावर उलटं उचलून 53 सेकंदात चढला 100 पायऱ्या
दुसऱ्या शहरात जाऊन बेलीने ऑनलाइन वेबसाईट्समार्फत शुगर डॅडीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते लोक पैसे खर्च केल्यानंतर तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. तिला त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती पुन्हा सापडलीच नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Lifestyle, Viral, World news