पटना, 28 डिसेंबर: आपल्या पत्नीचं (Wife) दुसऱ्याच एका तरुणावर (Boyfriend) प्रेम (Love affair) असल्याचं लक्षात आल्यावर एका पतीनं तिचं बॉयफ्रेंडसोबत (Marriage with boyfriend) लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीच्या सुखासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असं म्हणत त्याने कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्करत दोन प्रेमींन एकत्र आणलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र ‘न्यूज 18 लोकमत’ या व्हिडिओच्या सत्यतेची खात्री देत नाही.
असं झालं लग्न
बिहारच्या जमुई भागात राहणाऱ्या विकासच्या पहिल्या पत्नीचं लग्नानंतर काही महिन्यांत निधन झालं होतं. त्यामुळे त्याचं दुसरं लग्न शिवानी नावाच्या तरुणीसोबत झालं. दोन वर्ष त्यांचा संसार चालला. जमुईवरून ते दोघं कामानिमित्त बंगळुरूला राहायला गेले आणि तिथं भाड्याचं घर घेऊन राहू लागले. या दरम्यान, शिवानाचा लग्नापूर्वीचा प्रियकर सचिन तिला शोधत बंगळुरूत दाखल झाला. विकासला आपल्या पत्नीच्या प्रेमप्रकरणाविषयी काहीच माहिती नव्हती. महेशनं आपल्या नातेवाईकाच्या घरी मुक्काम ठोकत शिवानीचा शोध सुरू केला. काही दिवसांतच त्याने तिचा पत्ता शोधून काढला आणि संपर्क साधला.
भेटीगाठी सुरू
शिवानी आणि सचिन यांच्या चोरून भेटीगाठी सुरू झाल्या. एक दिवस संशय आल्याने विकासने दोघांना पकडलं आणि पुन्हा कधीही एकमेकांना न भेटण्याची ताकीद दिली. मात्र सचिननं ते ऐकलं नाही. त्यावरून दोघांमध्ये हाणामारीही झाली. या घटनेनंतरही शिवानीनं सचिनला भेटणं सुरूच ठेवलं. त्यामुळे गहन विचार करत विकासने शिवानीचं लग्न सचिनसोबत लावून देण्याचा निर्णय घेतला.
हे वाचा -
हम दिल दे चुके सनम
हम दिल दे चुके सनम या चित्रपटात ज्याप्रमाणे नवरा आपल्या बायकोचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्यासाठी बाहेर पडतो, तशीच काहीशी गोष्ट या तिघांची झाली. फरक एवढाच की प्रत्यक्षात घडलेल्या घटनेत तरुणी तिच्या प्रियकरासोबत लग्न करून निघून गेेली. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली असून ही अजब प्रेमाची गजब कहाणी आहे, असं नेटिझन्स म्हणत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Love story, Marriage, Wife and husband