मिनेसोटा, 25 मार्च : अमेरिकेतील मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात (Minnesota zoo in america) 'पुतिन'ला (putin) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण 'पुतिन' यांना वाचवता आले नाही. नवल वाटायला नको, आम्ही तुम्हाला पुतिन नावाच्या 12 वर्षांच्या वाघाबद्दल सांगत आहोत. तो 2015 पासून मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात राहत होता. वैद्यकीय तपासणीदरम्यान पुतिन याचा मृत्यू झाला.
मिनेसोटा प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राण्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळं बुधवारी डॉक्टर 'पुतिन' नावाच्या अमूर वाघाच्या आरोग्याची तपासणी करत होते. त्याच दरम्यान पुतिन वाघाला हृदयविकाराचा झटका (tiger heart attack) आला. पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालयातील लोकांनी सर्व प्रयत्न केले. पण वाघाला वाचवता आले नाही.
आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली
मिनेसोटा प्राणीसंग्रहालयाच्या प्राण्यांची काळजी आणि संवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. टेलर याव म्हणाले की, ही एक नियमित प्रक्रिया आहे. ही वाघांची काळजी घेणं आणि संवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तपासणीदरम्यान आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. या वाघाला वाचवण्यासाठी टीमने पूर्ण ताकद लावली होती. पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही.
हे वाचा - हायपरसॉनिक तंत्रज्ञानात आमच्यापेक्षाही भारत आघाडीवर; अमेरिकन खासदाराची कबुली
प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी शोकसागरात
मिनेसोटा प्राणीसंग्रहालयाचे संचालक जॉन फ्रॉले म्हणाले की, मिनेसोटा प्राणीसंग्रहालयातील आमच्या सर्वांसाठी आजचा दिवस खूप कठीण आहे. वाघाच्या मृत्यूनं आम्हाला मोठा धक्का बसला आहे. येथे कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी शोकात बुडाले आहेत. पुतिन वाघाच्या मृत्यूनंतर, या प्राणीसंग्रहालयात आता सुंदरी नावाच्या प्रौढ मादी वाघिणीचे घर आहे. आपल्या प्राणिसंग्रहालयानं जागतिक स्तरावर व्याघ्र संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले. व्याघ्र संवर्धन मोहिमेसाठी आम्ही लाखो डॉलर्स उभे केले आहेत. मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात 40 वर्षांहून अधिक काळ व्याघ्र संवर्धनाचं काम सुरू आहे.
हे वाचा - युद्ध आणखी भडकणार? Ukraineच्या मदतीला धावून येत ब्रिटननं दिली 6000 missiles
चेक प्रजासत्ताक मध्ये 2009 मध्ये जन्म झाला
2015 मध्ये मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात आलेल्या 'पुतिन'चा जन्म 2009 मध्ये चेक रिपब्लिकमध्ये झाल्याचे फ्रॉले यांनी सांगितले. अॅपल व्हॅली प्राणीसंग्रहालयात येण्यापूर्वी तो डॅनिश प्राणीसंग्रहालयात 6 वर्षे राहिला होता. मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात 2017 मध्ये पुतिन वाघाच्या कुटुंबात लक्षणीय वाढ झाली होती. कारण, या वर्षी अनेक बछडे जन्माला आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.