Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीला धावून आला ब्रिटन, 6000 क्षेपणास्त्रं आणि आर्थिक मदतही करणार

Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीला धावून आला ब्रिटन, 6000 क्षेपणास्त्रं आणि आर्थिक मदतही करणार

Russia-Ukraine War: पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी उशिरा सांगितलं की, ब्रिटन रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्याला 6,000 क्षेपणास्त्रे आणि 33 दशलक्ष डॉलर आर्थिक मदत देईल.

  लंडन, 24 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. रशियन हल्ल्यामुळं (Russian Attack) युक्रेनमधील परिस्थिती हळूहळू बिकट होत आहे. दरम्यान, ब्रिटनने (Britain) युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत देऊ केली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी उशिरा सांगितलं की, ब्रिटन रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्याला 6,000 क्षेपणास्त्रं (missiles) आणि 33 दशलक्ष डॉलर आर्थिक मदत देईल. लष्करी मदतीत टँकविरोधी आणि उच्च-स्फोटक शस्त्रं समाविष्ट आहेत. नाटो आणि जी-7 नेत्यांसोबतच्या बैठकीत युक्रेनची ताकद वाढवण्यासाठी आणखी काय करायला हवे यावरही एकमत होऊ शकते. युक्रेनवरील आक्रमणाविरोधात पाश्चात्य देशांनी रशियावर आतापर्यंत अनेक निर्बंध लादले आहेत. ब्रिटन युक्रेनला 6 हजार क्षेपणास्त्रं पाठवणार ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सन पाश्चात्य देशांना युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी आणि रशियावर आर्थिक निर्बंध वाढवण्याची विनंती करतील. डाउनिंग स्ट्रीटने सांगितले की, ते युक्रेनच्या संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी भागीदारांसोबत काम करण्याच्या ब्रिटनच्या इराद्याबद्दल तपशीलवार माहिती देतील. हे वाचा - Russia-Ukraine युद्ध सुरू असताना रशियात अचानक वाढलीय कंडोमची मागणी; विक्रीत 170 टक्क्यांनी वाढ
   रशिया युक्रेनच्या गल्ल्या आणि शहरं नष्ट होत असताना आम्ही थांबू शकत नाही. युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत वाढवण्यासाठी ब्रिटन आमच्या मित्र राष्ट्रांसोबत काम करेल. या लढ्यात युक्रेनची संरक्षण क्षमता मजबूत होईल, असे बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनसाठी नवीन समर्थन पॅकेजचे अनावरण करताना एका निवेदनात म्हटले आहे.
  हे वाचा - पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात का दाखल करण्यात आला अविश्वास प्रस्ताव? आर्थिक मदत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनमध्ये स्वातंत्र्याचा ध्वज जिवंत राहण्यासाठी जोखीम पत्करण्याची गरज आहे. नेक्स्ट-जनरेशन लाइट अँटी-टँक वेपन सिस्टम (NLAWs) आणि तथाकथित जेव्हलिन क्षेपणास्त्रांसह ब्रिटनने कीवला आधीच 4,000 हून अधिक अँटी-टँक शस्त्रे प्रदान केली आहेत. यासोबतच 25 दशलक्ष पौंडांचा नवा निधी युक्रेनचे सैनिक, पायलट आणि पोलिसांचे पगार देण्यासाठी उपयोगी ठरेल.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Britain, Russia Ukraine, Ukraine news

  पुढील बातम्या