Home /News /videsh /

हायपरसॉनिक तंत्रज्ञानात आमच्यापेक्षाही भारत आघाडीवर; अमेरिकेच्या खासदारानेच दिली कबुली

हायपरसॉनिक तंत्रज्ञानात आमच्यापेक्षाही भारत आघाडीवर; अमेरिकेच्या खासदारानेच दिली कबुली

यूएस सिनेटरने नमूद केलेले हायपरसॉनिक तंत्रज्ञान हे क्षेपणास्त्रांच्या बाबतीत सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जाते. ध्वनीच्या वेगाच्या 5 पट जास्त वेगाने फिरणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक म्हणतात. किलोमीटरमध्ये, 6000 किमी प्रतितास पेक्षा वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक म्हणतात.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 24 मार्च : लष्करी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेला जगाचा लीडर (US world leader) मानलं जात असलं तरी आता या क्षेत्रातील त्यांचं वर्चस्व पणाला लागलं आहे. निदान हायपरसॉनिक क्षेपणास्त्र (Hypersonic tech) तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरी तसं राहिलेलं नाही. अमेरिकेतील प्रभावशाली सिनेटर जॅक रीड (Jack Reed) यांचे हे म्हणणे आहे. हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचा दाखला देत जॅक म्हणाले की, या बाबतीत अमेरिका केवळ रशिया आणि चीनच नाही तर भारताच्याही मागे आहे. खुद्द अमेरिकेच्या खासदाराने याची कबुली दिली जॅक रीड हे अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमधील सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. नामांकनासंदर्भात झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, एक काळ असा होता की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमचा दबदबा असायचा. पण आता तसे राहिले नाही. उदाहरणार्थ हायपरसोनिक तंत्रज्ञान घ्या. या बाबतीत अमेरिका चीन, भारत आणि रशिया यांच्याही मागे पडली आहे. या देशांनी खूप प्रगती केली आहे. सिनेटर रीड पुढे म्हणाले की, अण्वस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेला प्रथमच त्रिपक्षीय स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात ही आता द्विपक्षीय स्पर्धा राहिलेली नाही. त्यात आता चीनही सामील झाला आहे. हे वाचा - सरकार पडण्याच्या संकटात पंतप्रधान इम्रान यांना निवडणूक आयोगाचा झटका हायपरसोनिक तंत्रज्ञान म्हणजे काय? यूएस सिनेटरने नमूद केलेले हायपरसॉनिक तंत्रज्ञान हे क्षेपणास्त्रांच्या बाबतीत सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जाते. ध्वनीच्या वेगाच्या 5 पट जास्त वेगाने फिरणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक म्हणतात. किलोमीटरमध्ये, 6000 किमी प्रतितास पेक्षा वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक म्हणतात. वेग आणि दिशा बदलण्याची त्यांची क्षमता खूप चांगली आहे. यामुळे, त्यांचा माग काढणे आणि ती नष्ट करणं खूप कठीण आहे. ते त्यांच्या लक्ष्यांवर अगदी अचूक मारा करतात. अलीकडेच रशियाने युक्रेन युद्धात किंजल या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. हे वाचा - जर्मनीत इंधन दरवाढीचं कोडं सुटेना! मढ्याच्या टाळूवरील लोणी नेमकं कोण खातंय? भारताचा हायपरसॉनिक वेग भारत गेल्या काही वर्षांपासून हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार, भारत स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनवण्यात गुंतला आहे. भारत असे क्षेपणास्त्र बनवत आहे, जे पारंपारिक शस्त्रांसोबतच अण्वस्त्रे डागण्यास सक्षम असेल. जून 2019 आणि सप्टेंबर 2020 मध्येही अशा तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान, स्क्रॅमजेट इंजिनने सुसज्ज हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल Hypersonic Technology Demonstrator Vehicle (HSTDV) चा वेग ताशी 7500 किमी मोजण्यात आला. अमेरिकेच्या अहवालानुसार, भारताने असे 12 हायपरसॉनिक विंड बोगदे तयार केले आहेत, जिथे ध्वनीच्या वेगाच्या 13 पट वेगाने क्षेपणास्त्रांची चाचणी करता येते.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: India, India america

    पुढील बातम्या