मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Kabul Airport मध्येही घुसले तालिबानी; विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Kabul Airport मध्येही घुसले तालिबानी; विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता

तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा?, जाणून घ्या सत्य

तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा?, जाणून घ्या सत्य

अफगाणिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तालिबानचे दहशतवादी काबूल विमानतळामध्ये (Taliban at Kabul Airport) घुसले आहेत. या विमानतळाच्या माध्यमातूनच संपूर्ण जग सध्या अफगाणिस्तानसोबत जोडलं गेलं होतं.

  • Published by:  Kiran Pharate

काबूल 28 ऑगस्ट : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Regains Control of Taliban) केल्यापासून संपूर्ण जगाचं लक्ष तिथल्या लहान मोठ्या हालचालींवर लागलं आहे. अशात अफगाणिस्तानातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. तालिबानचे दहशतवादी काबूल विमानतळामध्ये (Taliban at Kabul Airport) घुसले आहेत. तालिबानच्या 313 बदरी स्पेशल फोर्स यूनिटनं काबूल विमानतावरील लष्करी विभात प्रवेश केला आहे. आतापर्यंत काबूल विमानतळावर अमेरिकेचा कब्जा होता. काबूल विमानतळाच्या माध्यमातूनच संपूर्ण जग सध्या अफगाणिस्तानसोबत जोडलं गेलं होतं.

बहिणी ग्रॅज्युएट होणं सहन न झाल्याने भावांनी केली मारहाण, भावांविरुद्ध गुन्हा

बुधवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाले (Kabul Airport Blast) होते. यात 13 अमेरिकेच्या सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं (IS-KP) घेतली होती. यूएस सेन्ट्रल कमांडचे हेड जनरल Frank McKenzie म्हणाले, की सैनिकांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. ISIS आणखी हल्ले करण्याची शक्यता आहे. विमानतळाला पुन्हा एकदा टार्गेट केलं जाऊ शकतं.

काश्मीरमध्ये कारवायांच्या मदतीसाठी ‘जैश’ची तालिबानकडे याचना

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की काबूलमध्ये आणखी स्फोट होऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं काबूल विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे. अमेरिकेनं तालिबान आणि हक्कानी नेटवर्क वेगवेगळे गट असल्याचं म्हटलं आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यानंतर अमेरिका प्रचंड नाराज आहे. यानंतर अमेरिकेनं दहशतवादी संघटना IS-KP चा बदला घेणार असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, की अमेरिका आपल्य शत्रूंना शोधून मारेल.

First published:

Tags: Afghanistan, Taliban