मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Pathetic : बहिणी ग्रॅज्युएट होणं सहन न झाल्याने राखीच्या दिवशीच भावांनी केली मारहाण, अडाणी भावांविरुद्ध गुन्हा

Pathetic : बहिणी ग्रॅज्युएट होणं सहन न झाल्याने राखीच्या दिवशीच भावांनी केली मारहाण, अडाणी भावांविरुद्ध गुन्हा

आपण अशिक्षित (illiterate) असताना बहिणी (sisters) ग्रॅज्युएट (graduate) झाल्याची बाब सहन न झाल्याने चुलत भावांनी (brothers) बहिणींना मारहाण केल्याची (beating) घटना समोर आली आहे.

    जयपूर, 27 ऑगस्ट : आपण अशिक्षित (illiterate) असताना बहिणी (sisters) ग्रॅज्युएट (graduate) झाल्याची बाब सहन न झाल्याने चुलत भावांनी (brothers) बहिणींना मारहाण केल्याची (beating) घटना समोर आली आहे. स्वतः अशिक्षिबत किंवा अल्पशिक्षित असलेले भाऊ राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींना भेटायला आले होते. त्यावेळी पदवीचं शिक्षण पूर्ण करून त्यानंतरचं स्पेशल ट्रेनिंग घेणाऱ्या बहिणींकडं पाहून त्यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी बहिणींना मारहाण करायला सुरुवात केली. शिक्षण झाले असह्य राजस्थानमधील विश्र्नोई गावात हा प्रकार घडला. आपल्या घराण्यात कुणीही पुरुष शिकलेला नसताना महिलांनी ग्रॅज्युएट होणं योग्य नाही, असा दावा ग्रॅज्युएट झालेल्या बहिणींच्या चुलत भावांनी केला. त्यांच्या वडिलांनीदेखील या मुद्द्याचं समर्थन केलं. मात्र या दाव्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न बहिणींनी केला. याचा राग आल्यामुळे या चुलत भावांनी बहिणींना एका खोलीत कोंडून ठेवलं आणि काठीनं त्यांना मारहाण केली. बहिणींनं केली पोलीस तक्रार भाऊ मारहाण करत असताना दोन बहिणींनी या घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलं. खोलीत कोंडून घातलं असताना त्यांनी आतूनच पोलिसांना फोन करून या घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या बहिणींची सुटका केली. राखीपोर्णिमेनंतर चौथ्या दिवशीच या बहिणींनी भावांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. हे वाचा - Video: कवडीमोल भाव, नाराज शेतकऱ्यांनी क्रेट्सनं भरलेले टोमॅटो फेकले रस्त्यावर बहिणींनी पूर्ण केलं शिक्षण एकाच परिवारातील मूमल, नैनी, सुमित्रा आणि अनिता या चार बहिणी ग्रॅज्युएट झाल्या आहेत. त्यातील सीमा आणि तिच्या दोन बहिणींना शिक्षक होण्याची इच्छा आहे. तर चौथ्या बहिणीला IAS ची परीक्षा देऊन पोलीस सेवेत दाखल होण्याची इच्छा आहे. या बहिणींचे वडिल शेती करतात, तर भाऊ ट्रक चालवतो. वडिल आणि भाऊ घरी नसताना हा प्रकार घडला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Graduation, Rajasthan

    पुढील बातम्या