मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काश्मीरमध्ये कारवायांच्या मदतीसाठी ‘जैश’ची तालिबानकडे याचना, मिळालं अनपेक्षित उत्तर

काश्मीरमध्ये कारवायांच्या मदतीसाठी ‘जैश’ची तालिबानकडे याचना, मिळालं अनपेक्षित उत्तर

पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी संघटना (Terror group) जैश-ए-मोहम्मदनं (Jaish-E-Mohammad) काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी तालिबानकडे (Taliban) मदतीची (Help) याचना केली आहे.

  • Published by:  desk news
काबुल, 27 ऑगस्ट : पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी संघटना (Terror group) जैश-ए-मोहम्मदनं (Jaish-E-Mohammad) काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी तालिबानकडे (Taliban) मदतीची (Help) याचना केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरनं काही दिवसांपूर्वीच कंदाहारमध्ये जाऊन तालिबानच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मसूद अझर हा 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. तालिबानसोबत भेट मसूद अझरनं ज्या तालिबानी नेत्यांची भेट घेतली, त्यात अब्दुल गनी बरादर याचाही समावेश आहे. मसूद अझरनं यापूर्वीही तालिबानची वारंवार स्तुती केली होती. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिका पुरस्कृत सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाष्यदेखील मसूद अझरनं केलं होतं. याच काळात अझरनं ‘मंजिल की तरफ’ असा लेख लिहून तालिबानचं खुलेआम समर्थन केलं होतं. तालिबानला मागितली मदत भारताविरुद्ध कारवाया करून काश्मीरमध्ये अशांतता निर्माण कऱणे आणि काश्मीर भारतापासून तोडणे, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलेल्या मसूदने या कामासाठी तालिबानकडे मदतीची याचना केली आहे. मात्र तालिबानकडून याबाबत कुठलंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नसल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा - पहिल्यांदाच खाजगी कंपन्यांकडून PSLV ची निर्मिती तालिबानने केले हात वर तालिबाननं त्यानंतर काश्मीर प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली असून तो दोन देशांमधील अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणे आणि प्रशासनाची सोय लावणे, हा आपला अग्रक्रम असून इतर देशांच्या प्रश्नांत लक्ष घालण्यात तालिबानला रस नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्न असल्याचा पुनरुच्चार तालिबानने या भेटीतून केला आहे. भारतानं आमच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालू नये, असा इशारा तालिबानने दिला होता. तर आता आपणही भारताच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालण्यास उत्सुक नसल्याचे संकेत तालिबाननं दिले आहेत.
First published:

Tags: Afghanistan, Jammu and kashmir, Taliban

पुढील बातम्या