Home /News /videsh /

लवकरच उलघडणार किम यांच्या तब्येतीचं रहस्य, अमेरिकेनं पाठवली 5 खास गुप्तचर विमानं

लवकरच उलघडणार किम यांच्या तब्येतीचं रहस्य, अमेरिकेनं पाठवली 5 खास गुप्तचर विमानं

18 दिवसांपासून किम जोंग कुठे आहेत, याबाबत केवळ अफवा पसरल्या आहेत. मात्र आता किम जोंग यांची माहिती काढण्यासाठी अमेरिकेनं खास विमानं पाठवली आहेत.

    प्योंगयांग, 30 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या प्रकृतीबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. 18 दिवसांपूर्वी किम जोंग यांना सार्वजनिक ठिकाणी पाहिले होते, त्यानंतर किम कुठे आहेत याबाबत कोणालाच काही माहिती नाही आहे. काही वृत्तसंस्थांनी किम कोमात असल्याचे तर काहींनी किम यांच्या मृत्यूच्याही बातम्या दिल्या. दरम्यान, आता डेली मेल आणि द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अमेरिकेने उत्तर कोरिया आणि किम जोंग यांच्यावर नजर ठेवण्यासाठी 5 हायटेक गुप्तचर विमाने पाठविली आहेत. दरम्यान किम जोंग यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर विमाने पाठविण्याबाबत दक्षिण कोरियाच्या मीडिया चोसून इल्बोने सर्वप्रथम हा अहवाल प्रसिद्ध केला होता. अहवालात म्हटले आहे की अमेरिका आणि दक्षिण कोरिया किम जोंगशी संबंधित 'अफवांवर' नजर ठेवून आहेत. वाचा-सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये जखमी की मृत्यू? किम गायब झाल्यानंतर रंगल्या 5 चर्चा Chosun Ilboच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने 5 विमान पाठवले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे. लष्करातील सुत्रांनी Chosun Ilboला दिलेल्या माहितीत किमशी संबंधित खास माहिती गोळा करण्यासाठी विमान पाठविण्यात आले आहे. किमशी संबंधित माहिती संकलित करण्यासाठी आरसी RC-12s, E-8C Joint STARS, EO-5C Crazy Hawk सारखी विमाने पाठवण्यात आली आहेत.EO-5C विमान सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवू शकते. त्याचवेळी दक्षिण कोरियानेही माहिती गोळा करण्यासाठी आपले एक विमान तैनात केले आहे. वाचा-ना मृत्यू, ना कोमा; तर किम जोंग 'या' कारणामुळे झालेत अंडरग्राउंड सीआयएचे माजी तज्ञ जंग पाक यांनी, निवडक लोकांना ज्यांना किमच्या जवळ जाण्याची परवानगी आहे. त्यांना किम कुठे आहे हे देखील माहित नाही. सीआयएचे माजी विश्लेषक सुई मी टेरी म्हणाले की, उत्तर कोरियाने घोषणा केली तेव्हाच किम जोंग इलचे आजोबा किम जोंग इल यांच्या मृत्यूबद्दल जगाला माहिती देण्यात आली. दक्षिण कोरिया किम जोंगबद्दलच्या अफवांचा जाहीरपणे खोटे असल्याचे सांगत आहे. कोरोनाला घाबरून किम अंडरग्राउंड ब्रिटिश वृत्तपत्र द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे वृत्तपत्र जुन्गअंब लबोनं अशी बातमी दिली आहे की, किम जोंग बाहेर येत नाही आहेत, कारण त्यांच्या बॉडिगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियाची आणखी एक वृत्तपत्र डॉनंग-ए-लबोनं असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीनं किम जोंग प्योंगयांगच्या बाहेर एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, किम यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं किम यांना क्वारंटाइन केले असण्याची शक्यता आहे. वाचा-किम यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक जगाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी युक्ती दक्षिण कोरियाचे खासदार युन सांग-ह्युन यांच्या म्हणण्यानुसार, किम सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी स्वत: गायब झाले आहेत. त्यामुळं एक-दोन आठवड्यात ते पुन्हा सर्वांसमोर येऊ शकतात. युनने डोंगा डेलीला सांगितले आहे की किम काही आठवड्यांत पुढे न आल्यास ही मोठी बाब ठरू शकते. दरम्यानस किम यांच्या गायब होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही आहे. याआधीही 2014 मध्ये किम 6 आठवडे कोणालाही दिसले नव्हते. यामागील कारण आजपर्यंत समोर आलेले नाही. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Kim jong un

    पुढील बातम्या