मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक

किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर ते गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे.

किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर ते गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे.

किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर ते गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

प्योंगयांग, 27 एप्रिल : उत्तर कोरियचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर ते गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी या बातमीचे खंडन केले आहे. तर CNN नंतर आता हाँगकाँगच्या मीडियानेही किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या सगळ्यात आता किम जोंग यांची शस्त्रक्रिया डॉक्टरमुळे अपयशी ठरली असा अहवाल आता समोर आला आहे.

मेट्रो यूकेनुसार किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र त्यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असल्याचे समोर आले आहे. मेट्रो यूकेने केलेल्या दाव्यात, किम यांच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, जपानच्या साप्ताहिक मासिक शुकान बल्लाईने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने किम जोंग यांना गंभीर धोका आहे आणि त्याचे कारण स्वतः डॉक्टर आहेत.

वाचा-किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर

शस्त्रक्रिया करताना कापत होते डॉक्टरांचे हात

या रिपोर्टनुसार, किम जोंगची शस्त्रक्रिया उत्तर कोरियाच्या डॉक्टरांच्या पथकाने केली होती. त्याच टीमचा एक डॉक्टर शस्त्रक्रियेदरम्यान खूप घाबरला होता आणि त्याचे हात सतत थरथर कापत होते, यावेळी त्याने चूक केली आणि किम जोंग यांची शस्त्रक्रीया अयशस्वी झाली. यानंतर उत्तर कोरियानं चीनच्या डॉक्टरांशी संपर्क साधला, आता किम जोंग यांच्या उपचारासाठी चीनमधून डॉक्टरांची टीम पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की ही टीम बर्‍याच उशिरा आली आहे आणि सध्या किम यांची परिस्थिती नाजूक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंगच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे ही शस्त्रक्रीया अपयशी झाली.

वाचा-किम जोंग यांची प्रकृती खालावली? चीनच्या डॉक्टरांची टीम उत्तर कोरियात दाखल

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम

याआधी दक्षिण कोरियाच्या एका सुत्रांनी किम जोंग यांची प्रकृती ठीक असून, लवकरच ते लोकांसमोर येतील, असे सांगितले होते. मात्र सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी काही दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे.

वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published:

Tags: Kim jong un