प्योंगयांग, 27 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबत जगभरात वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये किम जोंग यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे. तर, काहींनी किम कोमामध्ये गेल्याचे सांगितले आहे. किम यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया झाली, ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे काही वृत्तसंस्थांनी सांगितले आहे. आता या सगळ्यात दक्षिण कोरियाच्या (South Korea) दोन वृत्तपत्रांनी किम जोंग पूर्णत: ठिक असून अंडरग्राउंड झाले आहेत, अशी माहिती दिली आहे
हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर किम गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी या बातमीचे खंडन केले आहे. तर CNN नंतर आता हाँगकाँगच्या मीडियानेही किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र आता किम कोरोनामुळं अंडरग्राउंड झाल्याचे समोर आले आहे.
वाचा-किम यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक
कोरोनाला घाबरले किम
ब्रिटिश वृत्तपत्र द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे वृत्तपत्र जुन्गअंब लबोनं अशी बातमी दिली आहे की, किम जोंग बाहेर येत नाही आहेत, कारण त्यांच्या बॉडिगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियाची आणखी एक वृत्तपत्र डॉनंग-ए-लबोनं असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीनं किम जोंग प्योंगयांगच्या बाहेर एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, किम यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वृत्तसंस्थांनी 15 ते 20 एप्रिल दरम्यान किम यांना फेरफटका मारतानाही पाहिले होते.
वाचा-किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर
किम यांनी पाठवला आभार व्यक्त करणारा मेसेज
दरम्यान, उत्तर कोरियाचे अधिकृत वृत्तपत्र रोडोंग सिनमून यांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंगने बांधकाम व्यावसायिकांचे आभार मानण्यासाठी मेसेजही पाठविला आहे. हा बिल्डर उत्तर कोरियामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉनसनमध्ये बीच रिसॉर्ट बनवित आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी किम जोंग यांची ट्रेन मागील आठवड्यात या शहराजवळ दिसली होती. याचे सॅटेलाइट फोटो व्हायरलही झाले होते.
वाचा-किम जोंग यांची प्रकृती खालावली? चीनच्या डॉक्टरांची टीम उत्तर कोरियात दाखल
किम कोमामध्ये असल्याचा दावा
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टनं जपानच्या मीडियाचे संदर्भ देत किम जोंग कोमामध्ये गेल्याचे सांगितले होते. तर, मेट्रो यूकेनुसार किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र त्यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असल्याचे समोर आले आहे. मेट्रो यूकेने केलेल्या दाव्यात, किम यांच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, जपानच्या साप्ताहिक मासिक शुकान बल्लाईने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने किम जोंग यांना गंभीर धोका आहे आणि त्याचे कारण स्वतः डॉक्टर आहेत.
संपादन, संकलन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kim jong un