मराठी बातम्या /बातम्या /विदेश /उद्या पृथ्वीवर धडकणार सौर वादळ; पृथ्वीवर येणाऱ्या संकटाबाबत NASA ने दिला गंभीर इशारा

उद्या पृथ्वीवर धडकणार सौर वादळ; पृथ्वीवर येणाऱ्या संकटाबाबत NASA ने दिला गंभीर इशारा

NASA warns of solar storm: सौर वादळाची पृथ्वीशी टक्कर होण्याच्या वेळेबाबत नासा आणि यूएस नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मतभेद आहेत. NASA ने ही टक्कर होण्याची वेळ 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता दिली आहे. तर अमेरिकेच्या NOAA ने या घटनेचा अंदाज 18 तासांपूर्वी वर्तवला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 मार्च ः आपण सौर वादळाबद्दल (Solar Storm) ऐकलं असेल. सूर्याच्या पृष्ठभागावरून विद्युत चुंबकीय उद्रेक होतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कण वाहून (Electromagnetic eruptions from the surface of the sun) जातात. या घटनेला सौर वादळ म्हणतात. ब्रिटनच्या भागात पृथ्वीच्या वातावरणाशी जोरदार सौर वादळ आदळण्याचा धोका असल्याचा इशारा नासानं दिला आहे.

सौर वादळाची पृथ्वीशी टक्कर होण्याच्या वेळेबाबत नासा आणि यूएस नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मतभेद आहेत. NASA ने ही टक्कर होण्याची वेळ 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता दिली आहे. तर अमेरिकेच्या NOAA ने या घटनेचा अंदाज 18 तासांपूर्वी वर्तवला आहे. आकाशाच्या यूके भागात, यावेळी एक तीव्र चमक दिसू शकते.

हे वाचा - 11 वर्षानंतर Congress खासदाराला भारी पडलं प्रकरण, कोर्टानं सुनावली शिक्षा

पृथ्वीवर येणार आहे सौर संकट!

खरं तर, जेव्हा सौर वारे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये किंवा वातावरणात प्रवेश करतात तेव्हा तीव्र प्रकाश निर्माण होतो. त्याला सामान्यतः अरोरा पोलारिस (aurora polaris) म्हणतात. उत्तर ध्रुवावर त्याला उत्तर प्रकाश असेही म्हणतात. स्पेस वेदर वुमन या नावानं प्रसिद्ध असलेल्या डॉ. तमिथा स्कोव्हा यांच्या मते, वादळ आदळतं तेव्हा दिवसभरात उच्च वारंवारता रेडिओ समस्या येऊ शकतात. डॉ स्कोव्हा यांनी सांगितलं की, या सौर वादळाची जोरदार टक्कर अपेक्षित आहे.

हे वाचा - Online Game ने लावलं याड, मानसिक संतुलन बिघडलं अन् रस्त्यावर पळू लागला सैरावैरा

सौर वादळ संध्याकाळी पृथ्वीवर धडकणार!

डॉ. स्कोव्हा यांनी असंही सांगितलंय की या टक्करचा प्रभाव मध्य-अक्षांशांपर्यंत देखील वाढू शकतो (The impact of the collision may also extend to mid-latitudes). सौर वादळात आकाशात चमकणारा प्रकाश लोकांना दिसतो का, असं विचारलं असता, डॉ स्कोव्हा म्हणाल्या की तो न्यूयॉर्कच्या ग्रामीण भागात दिसू शकतो. न्यूझीलंड आणि टास्मानियामध्ये दक्षिण ध्रुवावर चमक दिसू शकते कारण संध्याकाळी वादळ इथं धडकणार आहे. पुरेशा अंधारामुळं या भागात प्रकाश दिसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

First published:

Tags: Britain, Nasa, Storm