नवी दिल्ली, 26 मार्च : राजस्थानमधल्या चित्तोडगडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाला ऑनलाइन गेमचं (Online Games) इतकं व्यसन जडलं, की त्याला दोरीने बांधावं लागलं. रस्त्यावर वाहनं थांबवून तो तरुण हॅकर-हॅकर (Hacker) ओरडला. त्याचं हे कृत्य पाहून नागरिकांनी त्याला दोरीने बांधलं. दोरी सोडताच तो पुन्हा पळून जातो. ही घटना चित्तोडगडमधल्या भदेसर भागातली आहे. 22 वर्षीय इरफान काही दिवसांपूर्वीच बिहारमधून परतला असल्याचं सांगण्यात येत आहे. तासंतास तो मोबाइलवर ऑनलाईन गेम खेळायचा. गुरुवारी (24 मार्च) रात्री गेम खेळत असताना अचानक त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर तो वेड्यासारखा वागू लागला आणि ‘हॅकर आला, पासवर्ड बदलला (Password Change), आयडी लॉक (ID Lock) झाला,’ अशी बडबड करू लागला. त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे, की त्याने फ्री फायर गेम या ऑनलाईन गेममुळे वेड्यासारखं वागण्यास सुरुवात केली. रात्रभर घरच्यांनी त्याला समजावून सांगितलं; मात्र त्यानं ऐकलं नाही आणि सकाळी अचानक तो महामार्गावर धावू वेगाने लागला. इतकंच नाही तर नागरिकांना थांबवून हॅकर्स आणि आयडी हॅक याबद्दल बोलू लागला. तो ऐकत नसल्याचं समजल्यावर सर्वांनी त्याला पकडून दोरीने बांधलं. वाचा : वास्तूशांतीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू मोबाइल खराब झाल्यामुळे त्याला लागलं वेड मोबाइल खराब झाल्याने तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याचं बनसेन गावातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याच्या हातात मोबाइल असताना तो लोकांवर मोबाइल चोरीचा आरोप करू लागला होता, असं ग्रामस्थ सांगतात. आपला मोबाइल कोणी तरी चोरल्याचं तो वारंवार सांगत होता. एवढंच नाही, तर तो आणखी काही विचित्र गोष्टी करू लागला. घराच्या पाठीमागच्या शेतात कोणी तरी दुचाकीस्वार पिकाची नासाडी करत असल्याचंही तो सांगू लागला. तरुणाच्या वडिलांनी बिहारमध्ये दुकान उघडल्याचं ग्रामस्थ सांगतात. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला गावातून बोलावलं. त्यामुळे मुलगा बिहारला गेला होता; मात्र परत आल्यावर त्याची प्रकृती खालावली. वाचा : दिवसाढवळ्या हत्येचा थरार; तरुणाने पाठलाग करत पत्नीवर केले वार,घटना कॅमेऱ्यात कैद ऑनलाइन गेमर निर्माण करतात एक वेगळंच विश्व मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, की आपण दिवसभर ज्या वातावरणात राहतो त्याची आपल्याला सवय होते. ऑनलाइन गेमर्स (Online Gamer) त्यांचं स्वतःचं आभासी जग तयार करतात. हळूहळू त्यांच्या भावनाही त्या खेळाशी जोडल्या जाऊ लागतात. मग ते त्यांच्या आभासी जगात राहू लागतात. त्याचे हे दुष्परिणाम आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.