इंदूर, 27 मार्च: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh,Ujjain) उज्जैन येथे 2011 साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha, BJYM) आंदोलक कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हल्ल्याप्रकरणी इंदूरच्या विशेष न्यायालयाने शनिवारी काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह (Congress Rajya Sabha MP Digvijay Singh) यांच्यासह 6 जणांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा (special court in Indore) सुनावण्यात आली. न्यायालयाने सर्व 6 दोषींना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
न्यायालयानं ठरवलं दोषी
विशेष न्यायाधीश मुकेश नाथ यांनी दिग्विजय आणि उज्जैनचे माजी लोकसभा खासदार प्रेमचंद गुड्डू यांना भारतीय दंड संहिता (IPC) कलम 325 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे) आणि 109 (हल्ला करण्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवलं. तर अनंत नारायण, जयसिंग दरबार, अस्लम लाला आणि दिलीप चौधरी या इतर चार जणांना कलम 325 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.
थोड्याच वेळात मिळाला जामीन
उज्जैन जिल्ह्यातील तराना भागातील काँग्रेस आमदार महेश परमार, मुकेश भाटी आणि हेमंत चौहान या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. नंतर, दिग्विजयसह सर्व सहा दोषींच्या अपीलवर, विशेष न्यायाधीशांनी तात्काळ त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि 25,000-25,000 रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली.
काय प्रकरण आहे
हे प्रकरण हल्ल्याशी संबंधित आहे. हा खटला 17 जुलै 2011 चा आहे. त्यावेळी उज्जैनमध्ये बीजेवायएम कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेस नेत्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या दिग्विजय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीजेवायएमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये बीजेवायएमशी संबंधित कार्यकर्ता अमय आपटे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या प्रकरणी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिग्विजय आणि गुड्डूचे वकील राहुल शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या दोन्ही क्लाईंट्सना बीजेवायएम कार्यकर्ते रितेश खाबियाला मारहाण करण्यासाठी इतरांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. बचाव पक्षाच्या वकिलाने दावा केला की, "अभियोजन कागदपत्रांवर असं म्हटलं आहे की खाबियाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती, तर प्रत्यक्षात त्याच्या डाव्या हाताचं हाड मोडलं होतं."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Young Congress