मराठी बातम्या /बातम्या /विदेश /9 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणात कुत्र्याला अटक

9 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणात कुत्र्याला अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Dog arrest in rape case: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कुत्र्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

  मेक्सिको, 4 डिसेंबर : उत्तर अमेरिकेतील मेक्सिको (Mexico) येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाळीव कुत्र्याने बलात्कार (Minor girl raped) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात पोलिसांनी चक्क कुत्र्याला अटकही केली आहे. कुत्र्याला अटक केल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Shocking ! dog arrest in case of 9 year old girl)

  द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना मेक्सिको सिटीच्या तल्हाहुआक परिसरात घडली आहे. आपल्या मुलीवर पाळीव कुत्रयानेच लैंगिक अत्याचा केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला घेऊन ही महिला पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने या संदर्भात तक्रार दाखल केली. झी न्यूज ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

  पोलिसांना संशय

  या प्रकरणात पोलिसांनी कुत्र्याला अटक केली असली तरी पोलिसांना यात काहीतरी कट असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस विविध बाजूंनी आपला तपास करत आहेत. आपल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला पाळीव कुत्र्यावर आरोप करत आहे की, त्याने आपल्या मुलीवर बलात्कार केला असा संशय पोलिसांना आहे.

  वाचा : पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल

  पोलीस तपास सुरू

  पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाळीव कुत्र्याला अटक करण्यात आली असून पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात वैद्यकीय अहवाल अद्याप येणे बाकी आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल आणि नेमकं काय प्रकरण आहे हे सर्वांसमोर येईल.

  पीडित मुलीच्या आईने सांगितले की, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी माझी मुलगी आणि पाळीव कुत्रा दोघेच घरात होते. या पाळीव कुत्र्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. तर पोलिसांनी सांगितले की, या महिलेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीच्या सावत्र वडिलांनाही अटक केली आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.

  वाचा : 2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना

  चंद्रपुरात तरुणाने केला भटक्या कुत्रीवर अत्याचार

  काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. चंद्रपूरमध्ये (chandrapur) एका धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने भटक्या कुत्रीवर (raped on dog) अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (chandrapur police) या विकृत तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरूम लगतच्या जागेत ही घटना घडली. प्रकाश डाफ असं या विकृत तरुणाचे नाव आहे. या विकृत तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीवर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊ तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला.

  First published:
  top videos

   Tags: Crime, Dog, Mexico