हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 31 ऑक्टोबर : चंद्रपूरमध्ये (chandrapur) एका धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने भटक्या कुत्रीवर (raped on dog) अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (chandrapur police) या विकृत तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरूम लगतच्या जागेत ही घटना घडली. प्रकाश डाफ असं या विकृत तरुणाचे नाव आहे. या विकृत तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीवर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊ तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. Multibagger Stock: ‘या’ शेअरमधून गुंतवणूकदारांना 210 टक्के रिटर्न्स त्यानंतर स्थानिकांनी या घटनेबद्दल प्यार फाउंडेशन प्राणीमित्र संघटनेला याची माहिती दिली. संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसंच या संघटनेनं पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी प्रकाश डाफ याला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 377 नुसार शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मुंबईमध्ये एका वयोवृद्ध विकृताने 30 कुत्र्यांवर केला अत्याचार दरम्यान, मार्च महिन्यात मुंबईत सुद्धा अशाच एका विकृताने असेच कृत्य केले होते. कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 68 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली होती. ही घटना 2020 सालच्या डिसेंबरमध्ये घडली होती. ज्याचा नुकताच खुलासा करण्यात आला. 68 वर्षीय अहमद शाह नावाच्या वयोवृद्धाने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केला होता. याप्रकरणी बॉम्बे अॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. NCB ला दिलेले वचन Aryan Khan ने पाळले? २४ तासांत उचललं मोठं पाउल आरोपी अहमद शाह हा एक भाजी विक्रेता असून तो जुहू गल्लीत राहतो. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. एका स्थानिक व्यक्तीने विजय मोहनानी यांना अहमद शहाच्या या घृणास्पद कृत्याची माहिती दिली होती. आरोपी शाह हा परिसरातील भटक्या कुत्र्यांसोबत हे असं कृत्य करत असल्याचं संबंधित व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यानंतर बॉम्बे अॅनिमल राईट्सच्या विजय मोहनानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित वृद्धाला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.