Home /News /news /

Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल

Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल

Crime in Beed: पत्नीचे घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून (Wife's immoral relationship) पतीने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.

    बीड, 04 डिसेंबर: पत्नीचे घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून (wife's immoral relationship with Neighbors) पतीने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. बीड (Beed) शहराजवळील गोरे वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणानं पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट (Husband commits suicide) केला आहे. तरुणाने आपल्या राहत्या घराजवळील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत तरुणाच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली (Found suicide note) आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. उल्हास सीताराम पवार असं आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय पतीचं नाव असून तो बीड शहराजवळील गोरे वस्तीवरील रहिवासी आहे. मृत पवार याच्या पत्नीचं गेल्या काही काळापासून घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती मृत पती पवार यांना मिळाली. त्यांनी समज देऊनही पत्नीनं शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पवार यांनी आत्महत्या केली आहे. हेही वाचा-ओमिक्रॉनची दहशत! पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा मृत पवार यांनी गोरे वस्ती येथील आपल्या राहत्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस येताच, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृत तरुणाच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली आहे. यामध्ये मृत तरुणानं आत्महत्येचं कारण लिहिलं असून पत्नीचं घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोहत अनैतिक संबंध सुरू असल्याचा उल्लेख आढळला आहे. हेही वाचा-..अन् चिमुकल्या बहीण-भावाचं हरपलं विश्व; शेतकरी दाम्पत्याने केला हृदयद्रावक शेवट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Husband suicide

    पुढील बातम्या