मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना

2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना

 मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.

मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.

मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 03 डिसेंबर : पैशांसाठी माणूस कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. व्याजाने घेतलेल्या रक्कमेतील 2 हजार रुपये नंतर देतो म्हणून सांगितले पण शिवीगाळ करत तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना वर्ध्यातील (Wardha) नागसेन नगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शंभू सोनगडे असं मृत तरुणाचे नाव आहे. नागसेननगर येथील मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.

भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला

या रक्कमेतील 2 हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरीता २ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शैलेश येळणे हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने लवकरच परतावा करेल, असं सांगितलं. त्यावरून येळणे याने सोनगडे यांच्याशी वाद घातला.  दरम्यान, उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला.

बापरे! कारचा दरवाजा उघडताच मालकाला फुटला घाम; नेमकं असं काय होतं आत पाहा

दरम्यान, बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर गाडी नेली. आरोपी शैलेश एवढ्यावरच थांबला नाही कर त्याने त्याच गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. घटना दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेत गंभीर जखमी शंभू सोनगडे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी शैलेश याला अटक केली आहे. अवघ्या दोन हजार रुपयांसाठी घडलेल्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Wardha