मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भविष्यात जगावर पुतीन राज्य करणार? जाणून घ्या बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते

भविष्यात जगावर पुतीन राज्य करणार? जाणून घ्या बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते

Baba Vanga Prediction : आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी रशियाचं युद्ध (Russia Ukraine War Updates) आणि त्यानंतर जगावर होणारे परिणाम याबद्दल सांगितले होते. वयाच्या 85 व्या वर्षी, बाबा वेंगा यांनी 1996 साली या जगाचा निरोप घेतला.

Baba Vanga Prediction : आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी रशियाचं युद्ध (Russia Ukraine War Updates) आणि त्यानंतर जगावर होणारे परिणाम याबद्दल सांगितले होते. वयाच्या 85 व्या वर्षी, बाबा वेंगा यांनी 1996 साली या जगाचा निरोप घेतला.

Baba Vanga Prediction : आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी रशियाचं युद्ध (Russia Ukraine War Updates) आणि त्यानंतर जगावर होणारे परिणाम याबद्दल सांगितले होते. वयाच्या 85 व्या वर्षी, बाबा वेंगा यांनी 1996 साली या जगाचा निरोप घेतला.

नवी दिल्ली, 27 मार्च : जग भाकितं आणि ज्योतिषशास्त्रानुसार चालू शकत नाही. परंतु, जग अनेक वेळा बाबा वेंगाच्या रहस्यमय भविष्यवाण्यांच्या सत्यतेचा साक्षीदार (Baba Vanga Predictions Proven True) बनलं आहे. डोळे गमावलेल्या बाबा वेंगा यांनी 9/11 च्या हल्ल्यापासून ते ब्रेक्झिटपर्यंत अनेक वर्षांपूर्वी जाहीर केलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्याच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी, त्यांनी सांगितलेल्या 85 टक्के गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी रशियाचं युद्ध (Russia Ukraine War Updates) आणि त्यानंतर जगावर होणारे परिणाम याबद्दल सांगितले होते. वयाच्या 85 व्या वर्षी, बाबा वेंगा यांनी 1996 साली या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरताच त्या चर्चेत आल्या. रशिया आणि तिथले राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांच्याबाबतही त्यांनी अशीच भविष्यवाणी केली होती. हे खरं ठरलं तर अमेरिकेसह सर्वच युरोपीय देशांच्या अडचणी वाढतील.

हे वाचा - हृदयविकाराच्या झटक्यानं 'Putin'चा अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात मृत्यू

जगावर पुतीन यांची राजवट

बल्गेरियाच्या रहिवासी असलेल्या बाबा वेंगा यांनी 1979 मध्येच म्हटलं होतं की (Baba Vanga Shocking Predictions), एक दिवस रशिया जगावर राज्य करेल. Mirrorच्या अहवालानुसार, युरोप वेस्टलँड नापीक भूमी बनेल, तर रशिया हा “lord of the world” म्हणजेच जगाचा राजा होईल. त्या म्हणाल्या होत्या - 'सर्व काही बर्फासारखं वितळेल आणि फक्त व्लादिमीरचा विजय होईल, रशियाच्या गौरवाला कोणी स्पर्श करू शकणार नाही. रशियाला कोणीही रोखू शकणार नाही.'

हे वाचा - रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

बाबा वेंगा यांनी 2022 बद्दलही भविष्य  सांगितलं!

बाबा वेंगा यांनी 2022 च्या तीव्र उष्णतेबद्दल भाकीत केलं होतं आणि सांगितलं होतं की आपल्या देशातील तापमान 50 सेल्सियसच्या वर जाईल आणि देशाला दुष्काळाचा सामना करावा लागेल. पिकांवर होणाऱ्या टोळधाडीच्या हल्ल्याबाबतही त्या बोलल्या. इतकंच नाही तर, व्हर्च्युअल रिअॅलिटीबद्दलही त्या म्हणाल्या होत्या की, लोक जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवतील. बाबा वेंगाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर, कोरोनासारखी दुसरी महामारी अजून यायची आहे, जी सायबेरियातून येईल. बाबा वेंगा यांचं खरं नाव व्हेंजेलिया गश्तेरोवा होतं. त्यांचं डोळ्यांनी वादळात गूढपणे दृष्टी हरवली होती. परंतु, तेव्हापासून त्यांच्याकडे भविष्य सांगण्याची अद्भुत शक्ती होती.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine