Home /News /videsh /

Russia-Ukraine War: रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

Russia-Ukraine War: रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हा कर्नल युक्रेन युद्धात सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. 'द सन'च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं, की काही बंडखोर सैनिकांनी जाणूनबुजून त्यांच्यावर रणगाडा चढवला

कीव 26 मार्च : 24 फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि युद्धाला सुरुवात झाली. रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्या दरम्यानचं युद्ध एक महिना उलटूनही सुरूच आहे. या युद्धात दोन्ही देशांतल्या हजारो सैनिकांसह युक्रेनमधल्या निष्पाप नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. युक्रेनमधले सामान्य नागरिकही रशियन सैन्याला विरोध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. रशियाला युक्रेनवर ताबा मिळवण्यात यश आलेलं नाही. शिवाय दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता रशियन सैनिकांचं (Russian solider) मनोधैर्य खचू लागलं आहे. या सैनिकांना आता घरी जायचंय. परंतु युद्ध संपल्याशिवाय ते मायदेशी परतू शकत नाहीत. अशाच नाराज काही रशियन सैनिकांनी त्यांच्याच एका कर्नलला (Colonel Killed by Russian Army) मारून टाकल्याची बातमी समोर आली आहे. रशियन कर्नलला रशियाच्याच सैनिकांनी रणगाड्याने चिरडून ठार केल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. UNSC मध्ये रशियाविरोधातील प्रस्तावावर भारताकडून मतदान नाही; अमेरिकेनं दिली महत्त्वाची प्रतिक्रिया हा कर्नल युक्रेन युद्धात सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. 'द सन'च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं, की काही बंडखोर सैनिकांनी जाणूनबुजून 37व्या मोटर रायफल ब्रिगेडचे कमांडर युरी मेद्वेदेव यांच्यावर रणगाडा चढवला. या संदर्भातले काही फोटोज व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये कर्नल मेद्वेदेव यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयाच नेलं जात असल्याचं दिसतं. कमांडर युरी कीव्हजवळ मकारिव्हमध्ये जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. या संदर्भातलं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे. सैनिकांनी या कर्नलच्या पायावर रणगाडा चढवला होता; मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले होते, असं म्हटलं जात आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं पाश्चात्य देशांतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका अधिकाऱ्याने 25 मार्च रोजी सांगितलं, की ब्रिगेड कमांडर त्याच्याच सैनिकांच्या हातून मारला गेला. रशियन सैनिकांना यापुढे युद्ध (war) लढायचं नाही. त्यांना कसंही करून मायदेशी परतायचं आहे. Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारताला सर्वात मोठी संधी! शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी कर्नलना त्यांच्याच सैनिकांनी जाणूनबुजून मारल्याचं अधिकारी सांगत आहेत. सैनिकांनी त्यांच्यावर रणगाडा चढवला होता. यावरून हे दिसून येतं की रशियन सैन्य नैतिक आव्हानांचा सामना करत आहे. जवळपास अर्धं युनिट मारलं गेल्यानंतर सैनिकांनी बंड केलं. दरम्यान, युद्ध थांबलं नाही तर येत्या काही दिवसांत अशा आणखी घटना पाहायला मिळू शकतात. कारण रशियन सैनिक लढून थकले आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी परतायचं आहे. यापूर्वी या युद्धाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये आपल्याला फसवून युद्धात लढण्यासाठी आणलं गेलं, असा आरोप रशियन सैनिकांनी त्यांच्या वरिष्ठांवर केला होता.
First published:

Tags: Russia Ukraine, War

पुढील बातम्या