मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'जीव घेणं थांबवा, युद्धाने कोणाचंही भलं होणार नाही' पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेनला केलं हे आवाहन

'जीव घेणं थांबवा, युद्धाने कोणाचंही भलं होणार नाही' पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेनला केलं हे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी युक्रेनमध्ये (Ukraine) तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी युक्रेनमध्ये (Ukraine) तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी युक्रेनमध्ये (Ukraine) तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले.

कोपनहेगन, 3 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी युक्रेनमध्ये (Ukraine) तत्काळ युद्धविराम करण्याचं आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्य  मार्गावर परत येण्याचं आवाहन केलं. यादरम्यान, डॅनिश पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिकसन (Mette Fredriksen) यांनी आशा व्यक्त केली की, भारत युद्ध संपवण्यासाठी रशियावरील आपला प्रभाव वापरेल. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदींनी येथे पत्रकारांना सांगितलं की, त्यांनी युक्रेनच्या संकटावर चर्चा केली आणि युक्रेनमध्ये 'तत्काळ युद्धविराम' करण्याचं आवाहन केलं.

"आम्ही युक्रेनमध्ये तत्काळ युद्धविराम करण्याचे आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याचं आवाहन करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना "युद्ध संपवायला आणि हत्या थांबवायला" सांगितलं. "माझा संदेश अगदी स्पष्ट आहे की, पुतिन यांना हे युद्ध थांबवावं लागेल आणि लोकांची हत्या थांबवाव्या लागतील," असं ते म्हणाले.

हे वाचा - ..त्या दिवशी जेलेन्स्की परिवारासह तिथेच होते! रशियन फौजा अचानक पोहोचल्या जवळ..

पीएम मोदी मंगळवारी कोपनहेगनमध्ये पोहोचले आणि द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी फ्रेडरिकसन यांच्याशी चर्चा केली. शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली आणि काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. एका निवेदनात मोदी म्हणाले की, विविध क्षेत्रांमध्ये विशेषत: अक्षय ऊर्जा, आरोग्य, बंदरे, जहाजबांधणी, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि जल व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये "महत्त्वपूर्ण घडामोडी" झाल्याचा मला आनंद आहे. भारतात विविध क्षेत्रात 200 हून अधिक डॅनिश कंपन्या कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, "या कंपन्यांना भारतात व्यवसाय करणं सोपं आहे आणि आर्थिक सुधारणांचा फायदा होत आहे."

हे वाचा - व्लादिमीर पुतिन यांना पार्किन्सन? शरीराच्या अनियंत्रित हालचालींमुळे अफवा VIDEO

निवेदनानुसार, "दोन्ही बाजूंनी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमधील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी कौशल्य विकास, हवामान, अक्षय ऊर्जा, आर्क्टिक, P2P संबंध आणि इतर मुद्द्यांवर व्यापक सहकार्यावर चर्चा केली. डॅनिश राजधानीत पोहोचल्यानंतर एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, “पंतप्रधान फ्रेड्रिक्सन यांनी केलेल्या स्वागताबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. भारत-डेन्मार्क संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही भेट खूप महत्त्वाची ठरेल.”

First published:

Tags: Pm modi, Russia Ukraine, Ukraine news