मॉस्को, 1 मे : व्लादिमीर पुतीन यांच्या बिघडलेल्या तब्येतीच्या अफवांना सध्या पेव फुटलं आहे. गेल्या आठवड्यात पुतिन यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील बैठकीच्या व्हिडिओमध्ये, पुतिन त्यांच्या खुर्चीत बसून उजव्या हाताने टेबल पकडलेलं दिसत आहे. तसंच, ते उजवा पाय जमिनीवर अधूनमधून टेकवत आहेत आणि अस्वस्थ असल्यासारखेही वाटत आहेत. अधेमधे त्यांच्या हालचाली अनियंत्रित वाटत आहेत. ही एक दूरचित्रवाणी बैठक होती. पुतिन यांच्या या हालचालींवरून त्यांना पार्किन्सन्स डिसिज असल्याच्या अफवा उठल्या आहेत.
याआधी पुतिन यांच्या फुगलेल्या चेहऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडत असल्याची अटकळ पसरली होती. काही पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी पुतीन कर्करोगाने ग्रस्त असल्याचा दावाही केला होता.
Bloated Putin fuels Parkinson’s rumours after gripping table, slouching, and constantly tapping foot, while ordering to starve the Mariupol defenders to death unless they surrenderpic.twitter.com/WOElAgrXRi
— Alfons López Tena (@alfonslopeztena) April 22, 2022
एप्रिलमध्ये, क्रेमलिन यांनी पुतिन यांना पार्किन्सन्स किंवा थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं होतं.
पुतिन यांचा त्यांचे बेलारुशियन समकक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी हस्तांदोलन करत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पुतिनने त्यांचा उजवा हात छातीवर धरून ठेवला आहे जेणेकरून तो हलू नये, असं व्हिडिओ पाहून वाटत आहे.
रशियन अध्यक्षांचा पायही ताठ झाल्याचं आणि ते अडखळत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. हे पार्किन्सन या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे. 69 वर्षीय रशियन अध्यक्ष अलेक्झांडर यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना त्यांच चालणं अनियंत्रित झाल्याचंही दिसत आहे.
Putin’s Parkinson’s is showing. Via @Dayrabekov pic.twitter.com/nH16VEC7tE
— Dean Blundell (@ItsDeanBlundell) April 25, 2022
या व्हिडिओमुळे देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त असल्याच्या अफवांना उधाण आलं होतं. हा व्हिडिओ केवळ 8 सेकंदांचा असून तो रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यापूर्वीचा आहे.
हे वाचा - किम जोंगचे बाप ठरतील असे 5 हुकूमशहा, एकाने तर करवले 15 लाख महिलांवर बलात्कार!
पुतीन यांना पार्किन्सन्सचा त्रास झाल्याच्या अफवा ऑनलाइन पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑर्थोडॉक्स इस्टरच्या मध्यरात्रीच्या वेळी पुतिन आपले ओठ चावताना दिसले. तसंच ते काहीसे विचलित झालेलेही दिसत होते.
हे वाचा - जर्मनीत एका दिवसात सापडले जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण; इतर देशांचे असे आहेत हाल
पुतिन यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. वाटाघाटीतून हा संघर्ष संपुष्टात येईल, अशी आशाही पुतीन यांनी व्यक्त केली. युद्धग्रस्त देशात “सुरक्षित आणि प्रभावी” मानवतावादी कॉरिडॉर स्थापित करण्यासाठी रशिया आणि युक्रेन या दोघांनी एकत्र काम करण्याचे आवाहनही गुटेरेस यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia Ukraine, Russia's Putin