काबूल, 04 ऑगस्ट: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी (American army went back) घेतल्यापासून अफगाणिस्तानात (Afghanistan) हिसंक हल्ले (Attacks) वाढले आहेत. मागील तीन चार महिन्यांपासून या देशातील शांतता भंग झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे. तालिबान संघटनेच्या दहशतीमुळे अनेक नागरिक आपला देश सोडून अन्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या एका पॉश भागात मंगळवारी पुन्हा एक शक्तिशाली विस्फोट (Powerful Bomb blast) झाला आहे.
विशेष म्हणजे याठिकाणी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी राहतात. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु अनेक छोटे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले आहेत. तालिबानचे घातक हल्ले लक्षात घेता अफगाणिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) या विषयावर त्वरित चर्चा करावी, अशी मागणी भारताकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा-सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा
अफगाणिस्तानचे गृहमंत्री मीरवाइस स्तानिकझई यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजधानीच्या अत्यंत सुरक्षित भागात हा विस्फोट झाला आहे. अलीकडच्या काळात राजधानीत झालेला हा पहिला विस्फोट आहे. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्विकारली नाही, पण तालिबानी बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शक्यता आहे. कारण तालिबानी बंडखोर या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आक्रमक वाटचाल करत आहेत. देशाच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील भागावर दबाव आणला जात आहे.
हेही वाचा-पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती
काबूलमध्ये अलीकडे झालेल्या काही हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट गटानं घेतली आहे. परंतु काबूलमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, सरकार तालिबानला दोष देत आहे आणि तालिबान अफगाण सरकारला या हल्लासाठी दोष देत आहे.
हेही वाचा-सौदी अरेबियात प्रवाशांवरील निर्बंध अधिक कठोर, नियम मोडल्यास एक कोटीचा दंड
UNSC मध्ये तातडीनं चर्चा करण्याची मागणी
अफगाणिस्ताननं मंगळवारी भारताला काबुलमधील संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या कार विस्फोटांसह अन्य स्फोटांबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) तातडीनं चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ आतमार आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यांत चर्चा देखील झाली असल्याची माहिती सूत्रांनी सीएनएन-न्यूज 18 ला दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Bomb Blast