मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती, भारत देणार दणका

पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती, भारत देणार दणका

भारतातील (India) मोस्ट वॉन्टेट (Most wanted) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकलेला आतंकवादी मसूद अझहर (Terrorist Masood Azhar) पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील (India) मोस्ट वॉन्टेट (Most wanted) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकलेला आतंकवादी मसूद अझहर (Terrorist Masood Azhar) पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील (India) मोस्ट वॉन्टेट (Most wanted) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकलेला आतंकवादी मसूद अझहर (Terrorist Masood Azhar) पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: भारतातील (India) मोस्ट वॉन्टेट (Most wanted) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकलेला आतंकवादी मसूद अझहर (Terrorist Masood Azhar) पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मसूद अझहर हा पाकिस्तानातील (Pakistan) बहावलपूर येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच मसूद अझहरला पाकिस्तानी सैन्यांकडून (Pakistan Army) सुरक्षा पुरवली जात असल्याची माहिती देखील उघड झाली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानची नाच्चकी झाली आहे. आता भारत सरकार देखील पाकिस्तानला दणका देण्याच्या तयारीत आहेत. खरंतर, आतंकवादी संघटनांना आर्थिक मदत करत त्याचं पालनपोषण केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय संघटना एफएटीएफनं (FATF) पाकिस्तानला यापूर्वीच ग्रे लिस्टमध्ये (Pakistan in Gray List) टाकलं आहे.

हेही वाचा-पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत

अलीकडील काही काळापासून पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण मसूद अझहर पाकिस्तानात लपून बसलेली माहिती समोर आल्यानंतर, पाकिस्तानचा दुतोंडी पणाचा बुरखा पुन्हा फाटला आहे. पाकिस्तान आतंकवाद्यांना आश्रय देऊन त्यांचं पालपोषण करत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात लपून बसल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानात पुन्हा रॉकेट हल्ला; तालिबाननं कंधार विमानतळाला केलं टार्गेट

संबंधित वृत्तानुसार, कुख्यात आतंकवादी मसूद अझहर आजही पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये सुरक्षितपणे लपून बसला आहे. त्याचा एक अड्डा बहावलपूरमधील उस्मान-ओ-अली मशिदीजवळ आहे. तर दुसरा अड्डा सुभान अल्लाह येथील जामिया मशीदीजवळ आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान सैन्याचे सुरक्षा कर्मचारी अझहरच्या घराला सुरक्षा देत आहेत.

हेही वाचा- दानिश सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग...; तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा

पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवल्यामुळे 2008 ते 2019 या अकरा वर्षात पाकिस्तानच्या जीडीपीला तब्बल 38 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. भारतीय रुपयांत हा आकडा तब्बल 27,52,76,18,00,000 इतका आहे. यामुळे पाकिस्तान सध्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता भारत सरकार पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दणका देण्याच्या तयारीत आहे. आतंकवाद्यांना आसरा दिल्याप्रकरणी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आता ग्रे लिस्टमध्येच सडण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pakistan, Terrorism