मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दानिश सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग...; तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा

दानिश सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग...; तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा

पुलित्झर पुरस्कार विजेते (Pulitzer Prize winner) भारतीय फोटो पत्रकार (Indian Photo Journalist) दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती.

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: पुलित्झर पुरस्कार विजेते (Pulitzer Prize winner) भारतीय फोटो पत्रकार (Indian Photo Journalist) दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. दानिश सिद्दीकीची हत्या जाणूनबुजून करण्यात आली नसल्याचा दावा तालिबाननं (Taliban) केला होता. पण सिद्दीकी हे चुकून मारले गेले नाहीत, तर त्यांना जिवंत पकडून मग त्यांची हत्या केल्याचा दावा अफगान लष्कराकडून करण्यात आला आहे.

खरंतर, दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. कधी तालिबान आणि अफगाणिस्तानच्या लष्करात झालेल्या चकमकीदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर कधी तालिबान्यांनी सिद्दीकी यांची ओळख पटवून मग हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. पण तालिबान्यांनी सिद्दीकी यांना जिवंत पकडून मग त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा अफगान सैन्यांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा-पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत

सिद्दीकी यांची ज्याठिकाणी हत्या करण्यात आली. तो परिसर तालिबान संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुरावे गोळा करण्यास अडचणी येत असल्याची माहितीही अफगाण लष्कराचे प्रवक्ते अजमल ओमर शिणवारी दिली आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचा-तालिबाननं दानिश सिद्दीकींची हत्या कशी केली? सुन्न करणारी माहिती आली समोर

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी अफगाण लष्करातील कमांडर बिलाल अहमद यांनी दानिश सिद्दीकीसोबत तालिबान्यांनी केलेल्या क्रूर कृत्याबद्दल माहिती दिली होती. पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या स्पिन बोल्डक शहराच्या परिसरात तालिबान आणि अफगान सैन्यांची चकमक झाली. यावेळी तालिबान्यांनी एका अफगाण लष्करासह दानिश यांना गोळ्या घातल्याचं बिलाल यांनी सांगितलं होतं. दानिश सिद्दीकी हे भारतीय असल्याची माहिती मिळताच तालिबान्यांनी क्रूरपणे दानिश यांच्या डोक्यावरून चारचाकी गाडी घातली. दानिश यांचा मृत्यू झाल्याचं माहीत असूनही तालिबान्यांनी मृतदेहाची विटंबना करत आसुरी आनंद लुटला असल्याचंही कमांडर बिलाल अहमद यांनी सांगितलं होतं.

First published:

Tags: Afghanistan, Murder, Taliban