मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /सौदी अरेबियात प्रवाशांवरील निर्बंध अधिक कठोर, नियम मोडल्यास एक कोटीचा दंड

सौदी अरेबियात प्रवाशांवरील निर्बंध अधिक कठोर, नियम मोडल्यास एक कोटीचा दंड

सौदी अरेबिया आपल्या कठोर शिक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

सौदी अरेबिया आपल्या कठोर शिक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

सौदी अरेबिया आपल्या कठोर शिक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

  रियाध (सौदी अरेबिया) : काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेची (Third Wave) सुरुवात झाल्यानं पुन्हा एकदा जगभरात लॉकडाउन, कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अनेक देशांनी सुरक्षिततेचे कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली असून, परदेश प्रवासावरही निर्बंध घालण्यात येत आहेत. परदेशात प्रवास करणारे लोक देशात कोरोना पसरवू शकतात, अशी भीती सौदी अरेबियाला (Saudi Arabia) वाटत असल्यानं इथं परदेश प्रवासावर अत्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. सौदी अरेबिया आपल्या कठोर शिक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

  कोरोनाचा शिरकाव आपल्या देशात होऊ नये यासाठी आता या देशानं परदेश प्रवासावर कठोर नियम लागू केले आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन केल्यास अत्यंत कठोर दंडात्मक (Fine) कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या प्रवाशाला भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम ऐकली तर सर्वसामान्यांचे डोळेच पांढरे होतील. नियम मोडणाऱ्या प्रवाशाला थोडाथोडका नव्हे कोट्यावधी रुपयांचा जबर दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तीन वर्षांच्या प्रवास बंदीची (Travel Ban) कारवाई करण्यात येत होती. आता मात्र दंड भरावा लागणार आहे. झीन्यूज डॉट इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  ‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार, सौदीच्या सार्वजनिक अभियोजन कार्यालयानं (Saudi Public Prosecution Office) प्रवास निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढलेल्या देशांचा प्रवास केल्यास त्या प्रवाशाला 1लाख 33 हजार 323 डॉलर म्हणजे सुमारे 1 कोटी रुपये (One Crore Rupees Fine) दंड भरावा लागेल. अशा काही देशांची यादी सौदी अरेबिया सरकारनं जारी केली आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

  हे वाचा - लालूपुत्राला म्हणे दिसतं भूत; तेजप्रताप घेतात महादेवाचं नाव

  केवळ प्रवासीच नाहीत तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनाही हे नियम लागू आहेत. सौदी अरेबियानं प्रवासासाठी बंदी घातलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असं सरकारी अधिकाऱ्यांनी रविवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  रेड लिस्टमध्ये भारताचाही समावेश

  सौदी अरेबियानं प्रवासासाठी बंदी घातलेल्या देशांची एक यादी जारी केली असून या ‘रेड लिस्ट’मध्ये (Red List) पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आदी देशांसह भारताचाही (India) समावेश आहे. या आधी ‘रेड लिस्ट’ मध्ये समाविष्ट असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षे परदेश प्रवास बंदी घालण्याची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. आता मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. परिस्थिती सामान्य होईल तेव्हा ही बंदी उठवली जाईल, असं सौदी अरेबियाच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे.

  First published:

  Tags: Corona spread, Saudi arabia