नवी दिल्ली 23 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले (PM Modi Arrives in Washington to Attend Quad) आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांचं जोरदार स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी पोहोचले होते. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधूही विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या आनंदात भारतीय समुदायातील 100 हून अधिक लोक विमानतळावर पोहोचले होते (Indian-Americans Welcome PM Modi in Washington). UK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा या दौऱ्यावर, पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्यांसोबत बैठक घेतील. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पीएम मोदी वॉशिंग्टनला पोहोचताच भारतीय समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. विशेष गोष्ट म्हणजे पाऊस असूनही भारतीय-अमेरिकन पंतप्रधान मोदींची वाट पाहत राहिले. या लोकांना भेटण्यासाठी पीएम मोदी खास त्यांच्या कारमधून खाली उतरले.
मोदींनीही ट्विट करून वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, ‘वॉशिंग्टन डीसीला पोहोचलो. पुढील दोन दिवसात मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस, स्कॉट मॉरिसन, योशीहिदे सुगा यांना भेटणार आहे. या काळात मी क्वाड मीटिंगमध्ये भाग घेईन आणि टॉप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटेन आणि भारतातील आर्थिक कामगिरी त्यांच्यासमोर मांडेल.
US: Prime Minister Narendra Modi arrives at Joint Base Andrews, Washington DC for his 3-day visit.
— ANI (@ANI) September 22, 2021
He will be attending the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, & address United Nations General Assembly pic.twitter.com/CzU3qabCVT
हिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार? भारतीय वेळेनुसार शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांची भेट होईल. यावर्षी 20 जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बायडन यांची पंतप्रधान मोदींशी पहिली समोरासमोर बैठक होईल. त्याचबरोबर, कोरोना महामारी दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा पहिला मोठा परदेश दौरा आहे.