Home /News /coronavirus-latest-news /

भारताचं लसीकरण प्रमाणपत्र UK ने नाकारल्यानंतर QUAD संमेलनातच मोदींनी मांडला मुद्दा

भारताचं लसीकरण प्रमाणपत्र UK ने नाकारल्यानंतर QUAD संमेलनातच मोदींनी मांडला मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Quad summit मध्ये लसीकरण प्रमाणपत्राचा मुद्दा मांडल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मार्ग मोकळा होणार?

    वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर : भारताच्या दबावानंतर ब्रिटन सरकारनं कोव्हिशिल्ड लशीला (Britain approves Covishield but not Cowin certificate) मान्यता दिली पण कोविन सर्टिफिकेट म्हणजे भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला मात्र नाही, त्यामुळे त्या देशात जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) हा मुद्दा अमेरिकेतील क्वाड संमेलनातच (Quad summit) मांडला आहे. लसीकरण प्रमाणपत्राला परस्पर सामंजस्याने मान्यता देऊन आंतरराष्ट्रीय प्रवासा सुलभ सोपा करावा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. ब्रिटनने जाहीर केलेल्या ताज्या धोरणानुसार 4 ऑक्टोबरपासून काही विशिष्ट देशांमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल, तर अशा नागरिकांना देशात थेट प्रवेश दिला जाणार आहे. मात्र या यादीत ज्या देशांचा समावेश आहे, त्यात भारताचे नाव नाही. याचाच अर्थ भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लशीला मान्यता तर आहे, मात्र भारतातील सर्टिफिकेटला मान्यता नाही. म्हणजेच एखाद्या नागरिकाने जरी लसीकरण करून घेतले असेल तरी कोविन सर्टिफिकेटलाच मान्यता नसल्यामुळे भारतायांना ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्यात येणार आहे. भारतीय प्रवासी जेव्हा ब्रिटनमध्ये जातील, तेव्हा त्यांना तिथं कोरोना टेस्ट करून घेणं आणि विलगीकरणात राहणं (Corona test and quarantine mandatory) अनिवार्य असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोव्हिशिल्डचा मान्यता मिळाल्याचा काहीच फायदा भारतीय नागरिकांना होणार नसल्याचं चित्र आहे. हे वाचा - पुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा थेट क्वाड संमेलनात मांडला आहे. मोदी म्हणाले, "भारताने मानवतेकडे एक कुटुंब म्हणून पाहिलं आहे. आम्ही 150 पेक्षा जास्त देशांना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला आहे. 95 देशांना लस पुरवठा केला आहे. भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण सुरू आहे. नुकतंच एका दिवसात 25 दशलक्ष लोकांचं लसीकरण झालं. 200 दशलक्षपेक्षा जास्त नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. भारताने कोरोना लसीकरणासाठी कोविन हे डिजीटल माध्यम उपलब्ध करून दिलं आहे. लसीकरण प्रमाणपत्राला परस्पर सामंजस्याने मान्यता देऊन आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करायला हवा" हे वाचा - कोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर कोव्हिशिल्ड लशीला ब्रिटनने मान्यता दिली होती. आता कोविन सर्टिफिकेटलाही मान्यता मिळावी, यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान आता मोदींनीही हा मुद्दा क्वाड संमेलनात मांडला आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. ही मान्यता कधी मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Narendra modi, Pm modi speech

    पुढील बातम्या